माणगावजवळ अज्ञात दुचाकीच्या धडकेत : दुचाकीस्वाराचा म्रुत्यु, चालक किरकोळ जखमी.

 माणगावजवळ अज्ञात दुचाकीच्या धडकेत : दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालक किरकोळ जखमी.


पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव : दि. ३१ - माणगावपासून बारा किमी अंतरावर असणाऱ्या लाखपाले गावच्या हद्दीत मुंबई -गोवा महामार्गावर एका अज्ञात दुचाकीची धडक एका सुझुकी अँक्सीस दुचाकीला बसल्याने या अपघातात सुझुकी अँक्सीस दुचाकीवर मागे बसलेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर सुझुकीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. सदरील अपघात शनिवार दि.३१ डिसेंबर रोजी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.

   या अपघाताबाबत गोरेगाव पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,महाड बाजुकडून माणगाव बाजुकडे जाणाऱ्या अज्ञात दुचाकीची लाखपाले गावच्या हद्दीत मुंबई बाजुकडून पोलादपूरकडे जाणाऱ्या सुझुकी अँक्सीस दुचाकीला धडक बसली या अपघातात सुझुकी अँक्सीस दुचाकीवर मागे बसलेला तरुण परेश मुरलीधर नार्वेकर(वय-२२)रा.गोरेगाव प.मुंबई याचा म्रुत्यु झाला. तर सुझुकीचा चालक रोहित बबन पोटे (वय-२२)रा.गोरेगाव प.मुंबई हा किरकोळ जखमी झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच टेमपाले येथील सामाजिक कार्यकर्ते मजिदभाई लोखंडे व गोरेगाव पोलिसांनी अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात आणले.या अपघाताची नोंद गोरेगाव पोलिस दाखल करण्यात आली असून सदर अपघाताचा अधिक तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या