माणगांवकरांची ओम सिद्धी साई दिंडी कोकण श्रीक्षेत्र शिर्डीकडे रवाना.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. १ - गेली ११ वर्षाची परंपरा असलेली माणगांव ओम सिद्धी साई दिंडी कोकण ही १ जानेवारी २०२३ रोजी माणगाव शहरातील नानोरे ते शिर्डीकडे जाणाऱ्या पदयात्रेचा प्रारंभ सकाळी १० वाजता झाला.या पदयात्रेतील श्री साई पालखी व पदयात्रा सकाळी नानोरे येथील साई मंदिर येथून सुरुवात झाली त्यानंतर नानोरे चे ग्रामदैवत जनी बापूजी मंदिराला प्रदक्षिणा देत व नानोरे गावाला प्रदक्षिणा देत ही पालखी पदयात्रा मुंबई गोवा महामार्गवरून श्री दत्त मंदिर माणगाव -श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांचे निवासस्थान व त्यांनतर निजामपूर येथील कामेरकर यांचे निवासस्थान रात्री वस्ती अशी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डी कडे रवाना होत आहे.
सुमारे ३०० किमी पायी प्रवास असणाऱ्या पदयात्रेत सुमारे २३० साईभक्त सामील आहेत तर त्यापैकी १६५ साईभक्त पायी प्रवास करणार आहेत.या परंपरागत दिंडी चे नियोजन संस्थापक अशोक वाढवळ यांच्या प्रेरणेने साई चरणरज समाधान उतेकर कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष उतेकर, उपाध्यक्ष गजानन वाढवळ, चिटणीस महेंद्र पाटोळे,सहचिटणस भारत जाधव,पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर, उपाध्यक्ष महेश शिर्के, उपखजिनदार परेश म्हात्रे, सल्लागार दीपक थळकर,मिलिंद साखरे,सागर कोळवनकर,रमेश बक्कम यांच्या सह माणगाव तालुक्यातील बहुसंख्य साईभक्तांनी केले आहे.
या पदयात्रेचा प्रवास सुमारे ८ दिवसांचा असून प्रतिदिन ४० किमी अंतर साईभक्त कापणार आहेत.ही साईपालखी निजामपूर नंतर २ जानेवारी रोजी डोंगरवाडी विंझाई देवी मंदिर ताम्हिणी.३ जानेवारी मुळशी पौड,४ जानेवारी पौड ते देहू,५ जानेवारी राजगुरू नगर अवसर फाटा मंचर,६जानेवारी आळेफाटा धारगाव,७ जानेवारी साकुरफाटा ते संगमनेर ,८ जानेवारी कवठे कमळेश्वर ते नांदूरखी,९ नांदूरखी ते श्री क्षेत्र साईमंदीर शिर्डी असा असणार आहे.
ही श्री साई पालखी पदयात्रा सामाजिक एकोपा टिकावा, समाज सलोखा निर्माण व्हावा,सर्वधर्म सहिष्णुतेची शिक्षण समाजात रुजावी,साईबाबांची महती व चमत्कार जनमानसात रुजावे,हा उद्देश साईदिंडी च्या माध्यमातून आम्ही समाजात रुजवण्याचा आम्ही श्री साई प्रेरणेने प्रयत्न करत असल्याचे मत साईचरण समाधान उतेकर व पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कोरोना कालावधी संपल्यानंतर सर्व धार्मिक कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामूळे दरवर्षी पेक्षा या वर्षी ओम सिद्धी साईदिंडी कोकण माणगाव ला हजारो माणगांवकर आणि शेकडो साईभक्त उपस्थित होते माणगाव तालुक्यातील बाजारपेठ,विकासकॉलनी, साईनगर ,दत्तनगर, गणेशनगर या विभागातील आबालवृद्धानी पालखीचे दर्शनघेत पुष्पसुमनानी स्वागत केले.






0 टिप्पण्या