आपण सर्व ग्राहक आहोत-पुरवठा निरीक्षण अधिकारी संजय माने
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव-दि. २५- आपल्याला ग्राहक म्हणून आपले अधिकार आहेत. आपण सगळे ग्राहक आहोत, असे प्रतिपादन पुरवठा निरीक्षण अधिकारी संजय माने यांनी दि. २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक समारंभ कार्यक्रमात काढले. या राष्ट्रीय ग्राहक समारंभ कार्यक्रमास पुरवठा निरिक्षक संजय माने, गोदाम व्यवस्थापक परमेश्वर खरोडे, अव्वल कारकुन वंदना बागुल, श्री. टकले, रास्त भाव दुकान तालुका अध्यक्ष अनिल मोरे, दुकान प्रतिनीधी सुजित शिंदे, निलेश कासरेकर, रास्त भाव दुकानदार व नागरिक उपस्थित होते.
पुढील मनोगतात त्यांनी सांगितले की, प्रत्येक वस्तूवर हेल्पलाईन असते. वस्तु बाबत काही तक्रार असेल तर त्या हेल्पलाईन वर फोन करून तक्रार करायची असते. त्यानंतर थोडं थांबून कंपनीकडुन कोणताही प्रतिसाद नाही मिळाला नाही तर तुम्हाला ग्राहक म्हणून न्यायालयात दाद मागता येईल असे संजय माने यानी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ग्राहकाचे सहा अधिकार बाबत वंदना बागुल मॅडम यांनी सविस्तर आशी माहिती दिली. या वेळी अनिल मोरे, सुजित शिंदे, निलेश कासरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आय एस ओ मानांकन दुकानदारांना सीसीटीव्ही किट व स्मोक डिटेक्टर चे वाटप कारण्यात आले. हा कार्यक्रम झाल्या नंतर ग्राहका चे अधिकार काय? याबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली कढण्यात आली.




0 टिप्पण्या