आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे २०२३ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.
माणगांव-दि. २९- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तर्फे दिनांक २९ डिसेंबर रोजी माणगाव नगरपंचायतमध्ये माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, यांच्या हस्ते प्रकाशित करून लोकार्पण करण्यात आले. या वेळी माणगाव नगरपंचायत नगरसेवक दिनेश रातवडकर, राजेश मेहता, अजित तार्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य रणधिर कनोजे, मीडिया सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रसाद दत्तात्रय शिंदे, हॉटेल कोकण क्राऊन व हॉटेल निलांबरचे मालक चेतन नरेंद्र गायकवाड, निलेश यादव, मंदार शेलार, व पूर्ण माणगावकरांना मानाचे फेटे बांधणारे सचिन गोरेगावकर उपस्थित होते.
माणगावमध्ये प्रसाद शिंदे यांचे अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन ही संस्था गेले कित्येक वर्ष समाजकारणाची कामे करत कार्यरत आहे. संस्थेमार्फत भुकेलेल्यांना अन्नदान असो किंवा गरीब जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप असो किंवा उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप असो अशा प्रकारची अनेक सामाजिक कामे करण्यात अग्रेसर व यशस्वी काम करीत आहे. संस्थेचे संचालक गणेश वाघचौरे व समीर परब यांचे विशेष सहकार्य अशा प्रकारच्या कामाला लाभते. संस्थेचे मूळ उद्देश्य मानव अधिकारांचे जतन व रक्षण असून अन्याया विरुद्ध लढून पीडित व्यक्तीस त्याचे अधिकार मिळवून देणे हे आहे. अशाप्रकारे आय एच आर डब्ल्यू ए चे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा माणगांव येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.



0 टिप्पण्या