राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन
आर. डी. नॅशनल महाविद्यालय व अंबगोपाळ फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
माणगाव- दि. २३- अंबागोपाळ फाऊंडेशन व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आर. डी. नॅशनल महाविद्यालय बांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सोमजाई मंदिर पाणसई येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला अंबागोपाळ फाउंडेशन संस्थापक डॉ. हरीश शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, अत्याधुनिक शेती करताना रासायनिक खतांचा वापर करू नका. रासायनिक खतांमुळे विविध आजार होतात. रासायनिक खतांचा मुख्य दुष्परिणाम का कर्करोग असून त्यामुळे अनेक लहान मुलांचे व नागरिकांचे प्राण जातात. त्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय खते, गांडूळ खतांचा वापर करून शेती करा. रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे शेतीतून विष उत्पन्न होते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगेल तरच आपण जगू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला जास्तीत जास्त सहकार्य करा. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शेतकरी दिनानिमित्त पुरुषांना ब्लँकेट व महिलाना साड्यांचे वाटप आर डी नॅशनल महाविद्यालय व अंबालगोपळ फाऊंडेशन तर्फे करण्यात आले. रा. जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर शेतकरी नृत्य यावेळी सादर केले.



0 टिप्पण्या