हारकोल ग्रा.पं. निवडणुकीत सरपंचपदी थेट जनतेतून मविआ आघाडीच्या फाईजा इस्तियाक हुर्जुक विजयी.
माणगाव-दि, २०- माणगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण अशा हारकोल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीने बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला धक्का देत यश मिळवून सरपंचपदी आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फाईजा इस्तियाक हुर्जुक या दणदणीत मतांनी निवडून आल्या आहेत. नवनिर्वाचित सरपंच फाईजा हुर्जुक यांची भेट घेत माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे, माणगाव माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा संगीता बक्कम, माजी पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.
तालुक्यातील हारकोल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होऊन मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी तहसील कार्यालय माणगाव याठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला तालुक्याच्या तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांच्या अधिपत्याखाली व नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांच्या उपस्थितीत सुरुवात होऊन हारकोल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी थेट जनतेतून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फाईजा इस्तियाक हुर्जुक या दणदणीत मतांनी निवडून येऊन ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे. नवनिर्वाचित सरपंच फाईजा इस्तियाक हुर्जुक यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी एकमेकांना मिठी मारून मतमोजणी केंद्रात अभिनंदन केले. मतमोजणी झाल्यावर बाहेर आल्यानंतर सरपंच फाईजा इस्तियाक हुर्जुक यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच मित्रपरिवार व नातेवाईक यांनी एकमेकांना भेटून तसेच सरपंच व निवडून आलेले महाविकास आघाडीचे सदस्य, सदस्या यांचे अभिनंदन केले. हारकोल गावात महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा कौल जनतेने आपल्याला दिला. यापुढे ग्रामपंचायतीचा विकास हाच आपला एकमेव उद्देश असल्याचे नवनिर्वाचित सरपंच फाईजा इस्तियाक हुर्जुक यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. यावेळी इनायत हुर्जुक, निजाम हुर्जुक यांच्यासह आघाडीच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या