ग्रामपंचायत मुठवली तर्फे तळे राष्ट्रवादीच्या एकहाती
भाग्यश्री पवार या उपसरपंच पदाच्या दावेदार
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव- दि. २१- माणगाव तालुक्यातील मुठवली तर्फे तळे ही ग्रामपंचायत ही एकहाती राष्ट्रवादीच्या ताब्यात आली असून राष्ट्रवादीच्या वनिता शांताराम जाधव या सरपंच पदी निवडून आल्या आहेत. तर उपसरपंच पदी भाग्यश्री पवार या दावेदार असल्याचे म्हटले जात आहे.
सदर ग्रामपंचायत ही काही वर्षापूर्वी सेनेच्या ताब्यात होती. दि. १८ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाग्यश्री बुद्धकोश पवार, रमेश मुकणे, संजीवनी पारावे, अनिता उमाजी वाघरे, सुरेश नाडकर, संतोष भोकटे हे सदस्य बिनविरोध आले असून स्वाती गायकावाड, मंदा पवार , कृष्णा दळवी हे प्रत्यक्ष निवडणूकीने निवडून आले. सदर ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याने इंदापूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. भाग्यश्री पवार या बिनविरोध आल्या असुन उपसरपंच पदी त्यांची वर्णी लागेल अशी चर्चा स्थानिक मतदारांमध्ये दिसत आहे.



0 टिप्पण्या