माणगांव तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

 माणगांव तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

तालुक्यातील एकूण १९ ग्राम पंचायतींपैकी १७ महाविकास आघाडीला तर २ शिंदे गटाला

पोलीस प्रवाह न्यूज 

 माणगांव-दि. २०-  माणगांव तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल माणगांव तहसील कार्यालय येथे दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वा. चोख पोलीस बंदोबस्तात लागला असून माणगांव तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले. तर बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला अल्पशा ग्रामपंचयातींवर समाधान मानावे लागले आहे.

 माणगांव तालुक्यातील गोरेगांव, चिंचवली, डोंगरोली, दहिवली कोंड, नांदवी, न्हावे, पहेल, भागाड, मांगरुळ, मुठवली तर्फे तळे, शिरवली तर्फे निजामपूर, साई, हरकोल, होडगांव, कुमशेत, करंबेळी, टोळ खुर्द, पळसप, कुंभे,  या १९ ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपला असल्यामुळे निवडणूक लागली होती. यामध्ये १९ सरपंच पदासाठी एकूण ७० अर्ज दाखल करण्यात आले होते. तर १६६ सदस्यांसाठी ३११ अर्ज दाखल करण्यात आले होते. दि. ५ डिसेंबर रोजी झालेल्या छाननीत सरपंच पदाचे सर्वच ७० अर्ज वैध ठरविण्यात आले तर सदस्य पदाचे ३ अर्ज बाद करण्यात आले होते. दि. ७ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने यावेळी ३ ग्राम पंचायती या बिनविरोध झाल्या. करंबेळी, टोळ खुर्द व पळसप  या ३ ग्राम पंचायती सरपंच पदासाठी बिनविरोध झाल्या होत्या.  तर १६ ग्राम पंचायतींमध्ये पदासाठी मतदान दि. १८ डिसेंबर झाले होते.

निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी व महाविकास आघाडीने सरशी मारली. दि. २० डिसेंबरला लालगेल्या १६ ग्राम पंचायत निवडणुकीत गोरेगांव, चिंचवली, डोंगरोली, दहिवली कोंड, नांदवी, न्हावे, पहेल, भागाड,  मुठवली तर्फे तळे, शिरवली तर्फे निजामपूर, साई, हरकोल, होडगांव, कुमशेत, कुंभे या ग्राम पंचायतींवर  महाविकास आघाडीची सत्ता आली. तर  मांगरूळ ग्राम पंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला यश लाभले आहे. बिनविरोध झालेल्या ग्राम पंचायतींमध्ये   करंबेली व टोळ खुर्द महाविकास आघाडीला तर पळसप ग्राम पंचायत शिंदे गटाला भेटली होती. माणगांव तालुक्यातील एकूण १९ ग्राम पंचायतीं मध्ये १७ महाविकास आघाडी तर २ बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या आहेत.

 निकाल लागल्यानंतर निवडणूक आलेल्या उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट शेकाप व इतर मित्र पक्षांनी महाविकास आघाडीच्या घोषणा देत जल्लोष साजरा केला. विजयी उमेदवारांना विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीनी शुभेच्छा दिल्या असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निकाल लागलेल्या ग्राम पंचायतींचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे:-







































टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या