माणगांवात तालुका विधी सेवा समिती तर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
पोलिस प्रवाह न्यूज
माणगाव-दि. ९- माणगांवात तालुका विधी सेवा समिती माणगांव तर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. ९ नोव्हेंबर रोजी माणगांव तहसील कार्यालय येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती करणे व त्यांचे सक्षमीकरण करणे याबाबत माणगांव तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना मार्गदर्शन करण्यात आले. दि. ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हक्क हमारा भी तो है @ ७५ अंतर्गत उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यावेळी विधी सेवा समिती अध्यक्ष एन. एस. कोले, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर गजानन फुलझलके, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अनिल साटोटे, न्यायाधीश कनिष्ठ स्तर मनिषा पाठारे, तहसीलदार प्रियांका आयरे, नायब तहसीलदार भाबड, जेष्ठ विधी तज्ञ ॲड. विनोद घायाळ, ॲड. केदार गांधी, ॲड. यशवंत साधू, ॲड. देवदत्त ठाकूर, ॲड. रोशन पांढरे, ॲड सनील महाडिक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, न्यायालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कायदे तज्ञांकडून कामगार, महसूल, स्त्री कायदे व हक्क अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.




0 टिप्पण्या