कालभैरव क्रीडा मंडळ गोकुळवाडा आयोजित कबड्डी स्पर्धेत सोंडाई माता पाली कर्जत संघ प्रथम.
पोलीस प्रवाह न्यूज
खोपोली-दि. ८-कालभैरव क्रीडा मंडळ गोकुळवाडा आयोजित कबड्डी स्पर्धेत सोंडाई माता संघ पाली कर्जत संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर जय भोलेनाथ गोपाळवाट संघाने दुसरा क्रमांक पटकाविला असून टिटविचा राजा अ संघाने तिसरा क्रमांक आणि टिटविचा राजा ब संघाने चौथा क्रमांक पटकाविला आहे.
रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ह्या कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ह्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या असून रायगड जिल्हा धनगर समाज कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकूण २७ संघांनी सहभाग घेतला होता. सर्व संघाना पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.



0 टिप्पण्या