महामार्ग कंपनीने खड्डे भरण्याच्या कामात लावली थुकपट्टी.

 महामार्ग कंपनीने खड्डे भरण्याच्या कामात लावली थुकपट्टी.


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २२- मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे चालू आहे. माणगांव शहरात महामार्गाचे काम चेतक कंपनी  करीत आहे. महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम करीत असताना कंपनीने थुकपट्टी लावल्याचे दिसून येत आहे. 


मुंबई गोवा महामार्ग माणगांव शहराच्या बाहेरून जात आहे. परंतु, बायपासचे कामकाज अजून पूर्ण न झाल्याने माणगांव शहरातूनच अनेक वाहने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत आहे. माणगांव शहरातून जाणाऱ्या महामार्गवर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. आता सुद्धा दि. २२ नोव्हेंबर रोजी खड्डे भरण्याचे काम चालू असून खड्डयांत मोठ मोठी खडी टाकली जात आहे. फक्त खडी टाकून खड्डे बुजविले जात आहेत. खड्डा बूजविल्यानंतर थोड्या वेळाने हीच खडीवर येऊन इतरत्र पसरत असल्याने या खडी वरून अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले आहेत. खड्डे बुजविताना निकृष्ट दर्जाचे काम केले असल्यामुळे अपघात होत असून मोठी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न माणगांवचे पोलीस पाटील नथुराम पोवार व व्यावसायिक संतोष दोशी यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अनेक ठिकाणी धुळच धूळ उडत आहे. या धुळीमुळे रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दमा, श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. याच महामार्गावरून अनेक विद्यार्थी रोज शाळेत जातात. त्यांना सुद्धा या धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीवर संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या