मुंबई-गोवा महामार्गावर दगडी कोळशाची ओव्हरलोड वाहतूक.

       मुंबई-गोवा महामार्गावर दगडी कोळशाची                             ओव्हरलोड वाहतूक.


कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे वाहतूकदार देखील त्रस्त.


पोलीस प्रवाह न्युज 

माणगाव : दि. २३ - सध्या मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती चिंताजनक आहे.आणि त्यामध्ये देखील याच महामार्गावरून रायगड जिल्ह्यातील विविध जेट्टी वरून उतरविण्यात येणाऱ्या दगडी कोळशाची अवैधरित्या ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे चित्र मुंबई गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यात दिसून येत आहे.

    या कोळशाच्या ओव्हर लोड वाहतुकीच्या गाड्या रात्री किंवा पहाटे सकाळी सकाळी हया महामार्गावरून भरधाव वेगाने चालत असतात.प्रत्यक्ष असणारी बिलटी आणि गाडीमध्ये वाहतूक होत असलेला कोळसा यांच्या वजनाच्या समीकरणामध्ये जमीन-अस्मानाची तफावत असते.महामार्ग नादुरुस्त असून देखील अश्या कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकींमुळे झालेल्या कामाचा दर्जा देखील ब अजूनच खालावत चालला असून,अश्या परिस्थितीमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

     अशाप्रकारे चालू असलेल्या दगडी कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमध्ये जे वाहतूकदार,ज्यांच्या गाड्या वाहतुकीसाठी चालू आहेत ते चालक आणि मालक देखील त्रस्त झाले आहेत.एकतर ओव्हरलोड वाहतूक ती ओव्हर लोड वाहतूक त्यातून बिले निघणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे गाड्यांचे हफ्ते कसे फेडायचे, गाड्यांचा मेंटेनन्स कसा कसा करायचा हा पेचप्रसंग आता ह्या ओव्हरलोड वाहतूकदारांवर पडला आहे.यामध्ये अनेक वाहतुकदारांच्या गाड्या घरासमोर उभ्या आहेत.त्यामुळे अश्या मुंबई गोवा महामार्गावरील  अवैध ओव्हरलोड दगडी कोळशाची वाहतूक करणाऱ्यांवर संबंधित प्रशासनाने कडक कारवाई करावी.अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.तसेच प्रत्यक्ष ओव्हरलोड वाहतूकदारांची परिस्थिती आणि व्यथा  माणगाव मधील दत्तनगर येथील दगडी कोळसा वाहतूकदार स्वप्नील जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या