बुद्धिराज माने ची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर-दि. २२- महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने भद्रावती ( चंद्रपूर ) येथे दि- २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या १६ वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुरगूड विद्यालयाचा विद्यार्थी व मुरगूड व्हॉलीबॉल असोसिएशनचा खेळाडू बुद्धिराज विजय माने याची कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे .
कासेगांव जि.सातारा येथे कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल संघ निवड चाचणी स्पर्धा झाली . या स्पर्धत कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संघ सहभागी झाले होते. यामधुन १२ खेळाडूंचा कोल्हापूर विभागीय संघ निवडण्यात आला. त्यामध्ये बुद्धिराज मानेची निवड झाली आहे. त्यास शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी ताई देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई कोजीमाशीचे संचालक बाळ डेळेकर, प्राचार्य एस आर पाटील, उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी, उपप्राचार्य एस पी पाटील, पर्यवेक्षक सुधाकर निर्मळे, प्रशिक्षक अनिल पाटील, एम एच खराडे, एस एस कळत्रे यांचे मार्गदर्शन तर भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे सहसचिव, कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव प्रा . बाळासाहेब सुर्यवंशी, सहसचिव प्रा सुनील चव्हाण, बालवीर स्पोर्टस् चे भालचंद्र आजरेकर, वडील विजय माने, संस्था पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.



0 टिप्पण्या