रामराज्य रथ यात्रेचे माणगावमध्ये जल्लोषात स्वागत
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव-दि. ३- राष्ट्रीय एकता निर्माणकरिता, आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षांनिमित श्री राम दास मिशन (यु.सो) श्री शक्ती शांतानंद महर्षी यांच्या नेतृत्वाखाली आणि विश्व हिंदू परिषद, KHNA आणि अखिल भारतीय संत समिती यांच्यामार्फत विजया दशमी (दसरा) ५ आक्टोबर ते ३ डिसेंबर गीता जयंती दरम्यान श्री रामजन्मभूमी अयोध्या येथून सुरू झालेल्या व भारत नेपाळला जोडून २७ राज्य आणि ६० दिवसात १५०० किमी अंतर प्रवास करणाऱ्या रामराज्य रामरथ यात्रेचे भगवान श्री राम दिग्विजय यात्रेचे २ नोव्हेंबर रोजी माणगाव मध्ये आगमन झाले यावेळी समस्त हिंदू बांधवांकडून या रामरथ यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता माणगाव शहरातील बस स्थानकासमोर आगमन झालेल्या रामराज्य रथ यात्रेच्या स्वागतासाठी माणगाव तालुक्यातुन शेकडोंच्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होते. यामध्ये विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, माणगाव तालुका वारकरी संप्रदाय, राष्ट्रसेविका समिती तसेच विविध हिंदू समाज संघटना आणि हिंदू समाजबांधव होते. यावेळी माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी देखील रामराज्य रथ यात्रेचे दर्शन घेऊन माणगाव मध्ये स्वागत केले. रामराज्य रथ यात्रेचे माणगाव मध्ये आगमन होताच माणगाव मुंबई गोवा महामार्गावरून हायवे पोलीस चौकी ते अशोकदादा साबळे विद्यालय पटांगण अशी शोभायात्रा (मिरवणूक) काढण्यात आली. यानंतर साबळे विद्यालयातील झालेल्या सभेत संत महंतांच्या मार्गदर्शनानंतर पुढील मार्गक्रमणकरिता रामराज्य रथ यात्रा रवाना झाली. सदर प्रसंगी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



0 टिप्पण्या