माणगावमध्ये कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न

माणगावमध्ये कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.४- माणगाव शहरातील खांदाडमध्ये कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपुर्ण राज्यातूनच नव्हे तर देशभरातून अथांग वारकरी सांप्रदायिक भागवत धर्माच्या पताका हाती मिरवत विठ्ठलभक्तीच्या नादात, टाळ मृदंगासहीत अभंग व भजने गात कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरची वाट धरतात.  माणगाव खांदाड येथील या विठ्ठल रखुमाई मंदिरात एकादशीनिमित्त पूर्वापार असाच  सोहळा ग्रामस्थ व भाविकांच्या   उत्साहात पार पाडला जातो. ज्या भाविकांना  पंढरपूरला जावून विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत नाही, असे माणगाव तालुक्यातील बहुतांश वारकरी येथे येऊन दर्शन घेतात. खांदाड गावातील हे मंदिर विठ्ठल रखुमाई, हनुमान, राम लक्ष्मण सीता. असे मंदिर असल्याने भाविकांची दर्शनसाठी ये-जा सतत असते तसेच विविध धार्मिक कार्यक्रम देखील साजरे केले जातात. आज कार्तिकी एकादशी निमित्त सकाळी पूजा, आरती तसेच रात्री भजनाचे आयोजन करण्यात आले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या