मंडळ अधिकारी दिनेश गुजराथी अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

 मंडळ अधिकारी दिनेश गुजराथी अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

पोलीस प्रवाह न्यूज

कर्जत तालुक्यातील कशेळे मंडल अधिकारी अँटी करप्शन ब्युरो च्या जाळ्यात अडकला,  ७ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले. दिनेश रमाकांत गुजराथी असे या आरोपी मंडळ अधिकाऱ्यांचे नाव असून न्यायालयाने कशळे जामरुंग येथील रो हाऊस सील करण्याचे आदेश दिले असताना त्या रो हाऊस ला सिल करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिकव्हरी एजंट कडून मंडळ अधिकारी दिनेश गुजराथी यांनी पैस्याची मागणी केली असता कारवाई करण्यात आली.

कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम परिसरत येत असलेल्या कशळे येथील जामरुंग विभागातील रो हाऊस नंबर ६३ बी,इलेजंट फेज एक,इलेजंट कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर१९३ तर नवीन २६२ हा स्टेट बँकेकडून सील करण्याकरिता माननीय न्यायालयाने आदेश दिले होते. त्या करिता मंडळ अधिकारी दिनेश रमाकांत गुजराथी यांनी रो हाऊस सील करण्यासाठी तक्रारदार बँकेचे अधिकृत रिकव्हरी एजंट यांच्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती,दरम्यान तडजोडीअंती मंडळ अधिकारी यांनी १० हजार रुपयांची मागणी केली असता त्याचा पहिला हप्ता म्हणून आज सात हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी दिनेश रमाकांत गुजराथी हे ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकले.दरम्यान गुजराथी यांच्या विरोधात आता कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.यावेळी सापळा पथक सुरेश चोपडे,पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोंडकर ,पोहवा/संदेश शिंदे, म पोहवा/ दिपाली गणपते तर मार्गदर्शन अधिकारी पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र,अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक,  एसीबी ठाणे परिक्षेत्र उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या