डि.वाय.एस.पी प्रविण पाटील सेवानिवृत्त ; निरोपाच्या सोहळ्यात माणगांवकरांनी केला हृदयस्पर्शी सन्मान.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव: दि. २ नोव्हेंबर - सदरक्षणाय खलनिग्रहनाय, स्वतःच्या कुटुंबापासुन दूर राहुन जनतेला सुरक्षित जिवनाचा आनंद मिळवुन देणारे, "जय जवान! जय किसान!" नाऱ्यातील एक बळीराजा ज्यांच्यामुळे सर्वांच्या मुखी दोन घास पडतात, तर दूसरे सैनिक(जवान) एक देशाच्या सिमेवर, रणभुमीवर आपले रक्षण करतात. तर दूसरा जवान देशांतर्गत शांतता सुव्यवस्था सुरक्षा प्रदान करतात ते म्हणजे पोलीस होय, सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी उतेखोल येथिल निसर्गरम्य रिसाॅर्टच्या भव्य प्रांगणात महाराष्ट्र पोलीस दलात ३५ वर्ष कर्तव्यदक्ष सेवा देणारे रुबाबदार डिवायएसपी प्रविण सुरेश पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमीत्त खास रायगड पोलीस दला तर्फे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पाठविलेले खास स्मृतीचिन्ह (मोमेंटो) भेट देऊन त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
चित्रपटात शोभेल अशी ३५ वर्षे पोलीस खात्यात जनसेवा करुन वयाच्या अटीमुळे सेवानिवृत्त झाले. आपल्या भावना व्यक्त करताना प्रविण पाटील यांनी "प्रत्येक युध्द कधिना कधी संपतच, आणि प्रत्येक योध्याला विश्रांती घ्यावीच लागते!" प्रवास जसा आपण ठरवलाय तो वेळेत संपला कि प्रवासातील आठवणीं शेअर करण्यात मजा असते! आपल्या अर्धांगिणीची पहिली भेट याच सिक्रेट मात्र मी आता सांगत नाही अस बोलताच उपस्थितांमधुन हास्यलहर उमटली. दोन वर्षात बऱ्याच गोष्टी विसरलो पण आज इकडे सर्व मान्यवरांनी विचारांची मांदियाळी आठवण करुन दिली अनेक चढ उतार मी बघितले. माणगांववासिंयांनी भरपूर प्रेम दिल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. चार तासाचा आनंददायी सोहळा माणगांवकरांनी अनुभवला.
मुंबईतुन या कार्यक्रमास खास आलेल्या पाटील यांच्या मेहुणीने आपल्या प्रेमळ पितृतुल्य दाजींच्या कौटुंबिक गोष्टींना उजाळा दिला. सेवानिवृत्त मैत्रीणीनेही हजेर लावली. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन निलीमा काप मॅडम, रायगड भूषण कुवेसकर यांनी आपल्या खास शैलीत केले. मुंबईतुन आलेले हौशी जेष्ठ कलाकार प्रकाश भावसार यांनी "अरे दिवानो मुझे पहेचानों" गायिलेल्या गाण्याच्या तालावर ठेका धरत प्रविण पाटील यांनीही सुरात सुर मिसळताच एकच जल्लोष करीत सर्वांनी आनंद अनुभवला. सिंघम, प्रविण पाटील कायम स्मरणात राहतील अशा कार्यक्रमासाठी पोलीस अल्पेश पवार, अनिल रिठे, संतोष सगरे, पोलीस स्टेशनच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
पोलीस उप अधिक्षक प्रविण पाटील यांचा जन्म पालघरचा, त्यांचे वडिल बँकेत तर आई शिक्षिका घरात सुसंस्कृत वातावरण, १५ जुन १९८७ साली एमपीएससी ते पोलीस खात्यात अधिकारी म्हणुन कार्यरत झाले. २८ वर्षे मुंबई आर्थिक गुन्हे शाखा, क्राईम ब्रांच, पोलीस स्टेशन, डिटेक्शन ब्रांच विभागात त्यांनी काम केले. ३ वर्ष अमरावती विभागाची धुरा सांभाळली. पालघर भोईसर खेड रत्नागिरी येथे आपल्या कामाने लोकांची मने जिंकली. १६ऑक्टो. २०२० रोजी माणगांवला रुजु झाले. आपल्या अनमोल आयुष्यातील २८ वर्षे मुंबई कमिश्नर एरियात सेवा केली. प्रविण पाटील हे बि.काॅम. एमबीए उच्च शिक्षित असुन त्यांच्या व्यक्तिमत्वात एक देखणा कलावंत दडलेला आहे. अनेक हिंदी, मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. पैकी 'अब तक छप्पन्न' नाना पाटेकर सोबत तर जन्मठेप, कोल्हाट्याच पोर, सत्ताधीश. ओरखडा या चित्रपटात, छोट्या व्यावसायिक पडद्यावरही ते दिसले. अभिनयाचे अंग असलेला हा नायक प्रत्यक्ष जिवनातही खरा हिरो ठरला अस म्हटले तर वावगे ठरु नये.
त्यांची ओळख एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणुनही गुन्हेगारी जगताचा थरकाप उडविणारी, माणगांवात येताच वरिष्ठांचे आदेशाने अर्णव गोस्वामीला उचलणारे प्रविण पाटील सर्वच चॅनलच्या बातम्यांमधुन आपल्याला दिसले. या मागेही एक शांत संयमी, पोलीस मित्र अशी त्यांची प्रतिमा, दोन वर्षाहुन अधिक त्यांची सेवा माणगांवला लाभली. निकोप देहयष्टीचे रहस्य नित्य व्यस्त कामातही एरोबिक व्यायाम, योगा करणे. जिम मध्ये डबलबार पुशअप्स् व्यायाम प्रकार करताना त्यांना या वयात पाहुन आजच्या तरुणांनाही लाज वाटेल, अशी उर्जा उत्साह त्यांच्या ठायी आहे. न डगमगणारे एक संघर्षमयी जीवन आज सेवा निवृती होत असताना समस्त माणगांवकर व पोलीस कुटुंबियांचे वतिने त्यांचे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
पोलीसात निवृत्त होऊन पेन्शनर म्हणुन कुटुंबासोबत उर्वरित आयुष्य जगणे केवळ भाग्यवान लोकांचे नशिबी असते. त्यांची पत्नी सौ. संगिता प्रविण पाटील या सुध्दा मुंबई पोलीस खात्यात ए सी पी म्हणुन कार्यरत आहेत. तर सरांचा मुलगा ओम आणि मुलगी कल्याणी ही दोन मुले उच्चशिक्षित असुन अमेरिकेत स्थायिक आहेत. निवृत्तीनंतर ते अभिनयाची आवड जोपासताना रुपेरी पडद्यावर आपल्याला दिसतील यात शंका नाही. जग भ्रमंती करणे हा त्यांचा मानस आहे माणुस स्वतःच्या अनुभवातुन मोठा होत असतो. समाज जिवनात वावरताना समाजाची बारकाईने नजर असते त्यामुळे आपले आचरण शुध्द ठेवा, सामाजिक माध्यमांचा जपुन वापर करा. भावनिक पणे कोणालाही मदत करु नका. कायदा व सुव्यवस्था पाळुनच आयुष्य व्यतित करा. असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला, आपण केलेली सेवा आणि त्याचे संचित पुण्यच आपल्याला हे दिवस दाखवते साहेब तुम्ही भाग्यवंत आहात खरे हिरो आहात अशाच भावना सर्वांनी व्यक्त केल्या.





0 टिप्पण्या