नाभिक समाजाचे वैभव "गोंडर" कादंबरीचे लेखक अशोक कुबडे यांचा सत्कार.
पोलीस प्रवाह न्यूज
नांदेड : दि. २ - प्रसिद्ध लेखक अशोक कुबडे यांनी नाभिक समाजाचा जगणं मांडणारी बारा बलुतेदार व्यवस्थेतील व्यथा मांडणारी गोंडर ही कादंबरी लिहून प्रकाशनासाठी सिद्ध केली आहे. लवकरच या कादंबरीचे मोठ्या थाटात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. गोंडर ही कादंबरी अशोक कुबडे यांनी गेली दहा वर्षापासून सतत मेहनत आणि प्रयत्नशील राहून लिहिली आहे.ती आता प्रकाशनासाठी सिद्ध झालेली आहे. इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांनी ही कादंबरी स्वतः इसाप प्रकाशनाकडून स्वखर्चाने प्रकाशित केली आहे आणि लेखकास मानधन देऊन ती कादंबरी स्वीकारली आहे. या कादंबरी लिहिण्याचा आनंद नाभिक समाजाला झाला असून नाभिक समाजातील विविध संघटनांनी अशोक कुबडे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृहाचे ट्रस्टी मंडळाने अशोक कुबडे यांची त्यांच्या घरी भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय सुनील राऊत हे होते तर प्रमुख पाहुणे प्रकाशजी श्रीमंगले माजी विभागीय सचिव व जिल्हा अध्यक्ष व माधवराव सजणे माजी जिल्हा सचिव प्रमुख उपस्थिती श्री काटकर बी वाय जिल्हाध्यक्ष नांदेड श्रीमंगले चंद्रकांतजी शहर अध्यक्ष व महानगर अध्यक्ष बाळू पवार प्रसिद्ध प्रमुख दत्ता चापलकर विश्वस्त श्री राजेश भालेराव व ज्ञानेश्वर बनवसकर व दशरथ उर्फ बाळासाहेब गंगातीरे रहाटीकर जेष्ठ नेते माजी विश्वस्त रमेशराव भोंग सामाजिक कार्यकर्ते केशवराव सजणे व पोलीस पाटील बाबुराव कोत्तापल्ल, पुंडलिक सावळेश्वर कर अमित राऊत आदींची यावेळी उपस्थिती होती.
समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अशोक कुबडे यांनी गोंडर कादंबरी लिहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्यावर आपले मनोगत मांडले.शेवटी अशोक कुबडे यांनी सत्काराला उत्तर देऊन समाजाचे ऋण व्यक्त केले. आणि मी लिहिलेली कादंबरी ही जनमानसात आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गेली पाहिजे अशी नाभिक समाजाकडून अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश श्रीमंगले यांनी केले तर आभार दत्ता चाफलकर यांनी मांडले.



0 टिप्पण्या