जावळी (माणगाव) येथे प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्राच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकला लवकर मंजूरी मिळावी ; आमदार आदिती तटकरे

 जावळी (माणगाव) येथे प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्राच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकला लवकर मंजूरी मिळावी.  मा. पालकमंत्री तथा आमदार आदिती तटकरे यांची जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत आग्रही मागणी.


पोलीस प्रवाह न्यूज 

रायगड : दि.१७ - संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज (दि.१७ नोव्हेंबर) खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली सिडको भवन, बेलापूर येथे संपन्न झाली. यावेळी माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे, उपस्थित होते. प्रसंगी रस्ता सुरक्षेसंबंधी विविध विषयांवर उपाययोजना व कार्यवाहीबाबत उपस्थितांमध्ये चर्चा संपन्न झाली. 

यावेळी बैठकीत माजी पालकमंत्री तथा आमदार आदिती तटकरे यांनी मौजे जावळी, ता. माणगाव येथे नागरीकांच्या सोयीकरीता प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणीसाठी व इमारतीसाठी आवश्यक जमीन हस्तांतरीत करण्यास मंजूरी प्राप्त केली होती. यासंदर्भात राज्यमंत्री तथा पालकमंत्री असतांना आ. तटकरे यांनी दोन वेळा बैठक आयोजित केली होती. सदर प्रशिक्षण केंद्रात ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या मंजूरीसाठी लागणारी परवानगी राज्य परिवहन आयुक्तांकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजूरी मिळणेबाबत पाठपुरावा सुरू असून त्यास लवकर मंजूरी मिळावी अशी आग्रहाची मागणी आमदार आदिती तटकरे यांनी बैठकीवेळी केली. 

या जागेवर २५० X ६ मीटर्स आकाराचा ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणे, भूखंड विकसित करणे, आवार भिंतीचे बांधकाम, बांधीव गटार बांधकाम, ब्रेक टेस्ट ट्रॅक व्यतिरिक्त उर्वरीत जागेत पेव्हरब्लॉक पार्किंग बांधकाम, ब्रेक टेस्ट ट्रॅकवर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था, विद्युतीकरण व अनुषंगिक बाबींची उपलब्धता असणार आहे. माणगाव तालुक्यातील मौजे जावळी येथे होणाऱ्या या परिवहन प्रशिक्षण केंद्रात ब्रेक टेस्ट ट्रॅकमुळे दुर्गम व डोंगराळ भागातील नागरीकांना होणारा त्रास कमी होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या