आ. जयंत पाटील यांच्या हस्ते आर. डी. सी. बँक माणगांव शाखेचे उदघाटन

 आ. जयंत पाटील यांच्या हस्ते आर. डी. सी. बँक माणगांव शाखेचे उदघाटन

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव-दि. १८- रायगड जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माणगांव शहरातील मोर्बा रोड येथील स्टेट बँकेच्या समोरील सुसज्ज शाखेचे उदघाटन आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १८ नोव्हेंबर रोजी पार पडले. 

 

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अग्रगण्य तसेच सहकार महर्षी पुरस्कार प्राप्त बँक आहे. ग्राहकांचे हित जपून गुणवत्तापूर्वक सेवा देण्यासाठी ही बँक ओळखली जाते. कोअर बँकिंग सुविधा, आरटीजीएस, एन ई एफ टी सेवा, केसीसी डेबिट कार्ड, एटीएम कार्ड अशा अत्याधुनिक सुविधा या बँके मार्फत दिल्या जातात. माणगांव शहरातील मुंबई गोवा महामार्गावर या बँकेची शाखा होती. आता बँकेच्या स्वमालकीच्या जागेत रॉयल प्लाझा सुसज्ज इमारतीत सुरेख फर्निचरसहित माणगांव शाखेचे उदघाटन करण्यात आले आहे.

यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन आ. जयंत पाटील यांच्यासह व्हा. चेअरमन सुरेश खैरे, संचालक अस्लम राऊत, ज्ञानेश्वर भोईर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, शाखा व्यवस्थापक समीर देशमुख, विभागीय अधिकारी संजीव देशमुख, शेकाप माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे, जेष्ठ नेते अस्लम राऊत, नाना सावंत, स्वप्नील दसवते, संजय साबळे, ऍड. नितीन आंब्रे, ऍड. कौतुभ धामणकर, राजेश कासारे, नगरसेविका ममता थोरे,  फोफलुनकर, योगेश मोरे, दिनेश गुगले आदी शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते व आर. डी. सी. बँक कर्मचारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या