दूध गाडी चालक अमोल मुंढे यांनी जोपासली सामाजिक बांधीलकी.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव- दि. २५- माणगाव तालुक्यातील मौजे कशेणे येथिल अमोल नारायण मुंढे यांनी आपल्या पहिल्या मुलीचा कुमारी अनया करिश्मा अमोल मुंढे हिचा पहिला वाढदिवस माणगाव येथील जनजाती वनवासी आश्रमशाळा माणगाव येथे साजरा केला.
सध्या अनेक जण आपल्या मुलामुलींचे वाढदिवस थाटात करून अनाठई खर्च करतात. हे करण्यपेक्षा सामाजिक बांधीलकी जपत समाजातील अपेक्षित व उपेक्षित घटकांसाठी मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने माणगाव येथील आश्रम शाळेतील आदिवासी मुलांना गोड खाऊ व शाळेकरिता कचराकुंडी (डस्टबिन) व महापुरुषांच्या ५ प्रतिमेच वाटप यावेळी अमोल मुंढे यांनी केले. कार्यक्रमास मौजे कशेणे येथील राधाई डेरीचे मालक व प्रसिद्ध उद्योगपती विजय अण्णा केलुसकर, अमोल मुंढे व परिवार, सामाजिक कार्यकर्ते सागर मुंढे, समीर शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे अधिक्षक देगावकर सर यांनी केले. या कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक पाटिल सर, घाणेकर सर, रोशन पडवल सर, तसेच शाळेतील ४५० विदयार्थी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचा उपक्रम केल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.



0 टिप्पण्या