डॉ. आरीफ पागारकर यांचा ग्लोबल स्कॉलर्सप फाऊंडेशन तर्फे सन्मान

डॉ. आरीफ पागारकर यांचा ग्लोबल स्कॉलर्सप फाऊंडेशन तर्फे सन्मान



पोलीस प्रवाह न्यूज

माणगाव-दि. २५-  माणगांव तालुक्यातील जेष्ठ पत्रकार डॉ. आरीफ पागारकर यांना ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन रायगड भूषण पुरस्कार - लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड इन जर्नलिजम दि. २६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील अण्णा भाऊ साठे ऑडिटोरियम मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार आहे.

डॉ. पागारकर हे गेल्या ३ दशके पेक्षा जास्त कालावधी निर्भयपणे पत्रकारिता करत असून त्याचीच दखल घेऊन ह्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉ. पागारकर हे राष्ट्रीय नोंदणीकृत इंडियन प्रेस क्लब रायगड जिल्हाध्यक्ष असून अनेक शैक्षणिक संस्था, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ आरीफ पागारकर रत्नागिरीचे सुपुत्र असून रायगडला आपली कर्मभूमी समजून गेली २ दशके पत्रकारिते बरोबरच वैद्यकीय सेवा देत आहेत.  डॉ. पागारकर यांना पुरस्कार प्रधान करण्यात येणार असल्याचे वृत्त कळताच त्यांच्यावर मित्रपरिवार - संबंधितांकडून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या