माणगांव नगर पंचायतीतर्फे प्लास्टिक बंदी व स्वच्छता मोहीम.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. २९ - माणगाव नगर पंचायतीतर्फे नगर पंचायत हद्दीत प्लास्टिक बंदी व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
माणगांव शहर हे मुंबई गोवा महामार्गाच्या व रायगड जिल्हा च्या मध्यवर्ती ठिकाणी असून तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. यामुळे माणगांव बाजारपेठेत नेहमीच वर्दळ चालू असते. रस्त्याच्या दुतर्फा माणगांव बाजारपेठ असून छोटी मोठी अनेक दुकाने आहेत. या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असता माणगांव नगर पंचायत मार्फत प्लास्टिक बंद मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्लास्टिक का अविघटनशील असल्याने निसर्गावर त्याचा परिणाम होत आहे. नगर पंचायत कर्मचारी अशा प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या व ठेवणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. अनेक दुकानदाराना वर कारवाई करण्यात आली असून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. माणगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर पंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संतोष माळी व नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी केले.
तसेच माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये निजामपूर रोड, रेल्वे ब्रीज, कचेरी रोड, मोर्बा रोड, व जुने या ठिकाणी नागरिकांमार्फत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. नगर पंचायत मार्फत खूप वेळा जनजागृती व बॅनर द्वारे नागरिकांना उघड्यावर कचरा टाकू नये असे सूचित देखील करण्यात आले होते. तरी सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याने पासून माणगाव नगरपंचायतीने कर्मचाऱ्यांमार्फत अशा ठिकाणी विशेष मोहीम राबवून १० नागरिकांवर रुपये ५००/- दंडात्मक कार्यवाही केली आहे. लोकांनी इतरत्र कचरा टाकू नये ह्याबद्दल पुनः सूचित करण्यात आले आहे.



0 टिप्पण्या