सुलभ शिवपूजा ग्रंथ आवृत्ती ३ चा प्रकाशन सोहळा संपन्न.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. ८ - सुलभ शिवपूजा पद्धती या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्ती ३ चा प्रकाशन सोहळा दिनांक ६ नोव्हेंबर रोजी माणगाव मधील श्री वाकडाई देवी मंदिर येथे ष.ब्र.१०८ निगमागमभास्कर श्रीगुरु गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज बार्शी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाला.
रायगड जिल्हा मासिक रुद्र जंगम पुरोहित मंडळाची अनेक दिवसांची इच्छा या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याने पूर्णत्वास आली. मागील ग्रंथाप्रमाणे पुढील आवृत्ती लवकरात लवकर यावी. यासाठी अनेक दिवस मंदार स्वामी व अनेक माहेश्वर पुरोहित बांधवांनी मेहनत घेत मागील पुस्तकातील काही चुका सुधारून नवीन आवृत्तीत याहीपेक्षा काहीतरी अधिक देता यावं याकरता जास्तीत जास्त मेहनत घेऊन या पुस्तकाला आकार देत होते. यासाठी अनेक दिवसांचा काळ गेला. हा सोहळा सर्व कसर भरून काढणारा ठरला या दैदीप्यमान अशा ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी सर्वांनी आटोकाट मेहनत घेतली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून माहेश्वर बांधवांनी हातभार लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली याशिवाय कार्यक्रमाची उंची ही सुद्धा वाढली. भविष्यात असे उपक्रम रायगड जिल्ह्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जिल्ह्यातून व्हावे अशी इच्छा स्वतः गुरु सिद्ध मनीकंठ शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केली.
यापेक्षा दुसरं अजून आपल्याकार्याची पोचपावती कोणती हवी? गेले अनेक महिने आपल्या अखंडित शिव साधनेच हे फळ आहे हे निश्चित. असे बोलून समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सहकार्य राजपुरोहित प्रकाश स्वामी, प्रणव स्वामी , मंदार स्वामी , ओमकार स्वामी ,रोशन स्वामी , नितेश स्वामी आदी सर्व माहेश्र्वर बांधवांचे ,शैलेश स्वामी या सर्वांचे मनःपूर्वक आभार रायगड जिल्हा मासिक रुद्र मंडळ सर्वांचे कायम ऋणी राहील. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक कानाकोपऱ्यातून माहेश्वर बांधवांनी उपस्थिती लावली होती.




0 टिप्पण्या