५० खोके एकदम ओके
माणगांव राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ना. अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध
माणगाव-दि.-८- शिंदे-भाजप सरकार मधील मंत्री ना. अब्दुल सत्तार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलत असताना त्यांची जीभ घसरली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटले. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ना. सत्तारांच्या विधानावर संताप व्यक्त केला. माणगांव राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दि. ८ नोव्हेंबर रोजी माणगांव शहरात हॉटेल आनंद भुवन ते माणगांव बस स्थानक पर्यत मोर्चा काढत ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत ना. सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध केला.
यावेळी मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, महिला अध्यक्षा संगीता बक्कम, महाड पोलादपूर माणगांव विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर खानविलकर, मा. नगराध्यक्ष आनंद यादव, मा. नगराध्यक्ष योगिता चव्हाण, जेष्ठ नेते काका नवगणे, चंद्रशेखर देशमुख, उणेगाव मा. सरपंच राजेंद्र शिर्के, शहर प्रमुख रविंद्र मोरे, महिला पदाधिकारी श्रद्धा यादव, विशाखा यादव, तुलसा पवार, नगरसेविका सुविधा खैरे, रिया उभारे, रश्मी मुंढे, निजामपूर विभाग अध्यक्ष संदिप जाधव, उपाध्यक्ष गणेश चव्हाण, मा. उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, रत्नाकर उभारे, विलास यादव, नितीन वाढवळ, जयंत बोडेरे, युवक अध्यक्ष रुपेश तोडकर, उपाध्यक्ष तुषार करकरे, चेतन गवाणकर, सुमित काळे, स्वप्निल सकपाळ, महादेव खडतर, संदिप खरंगटे, तन्मय यादव, सिद्धांत देसाई, राजेंद्र जाधव, इकबाल हर्णेकर, जतिन महाडिक, शैलेश पाखुर्डे, सुशांत पडवळ, संतोष यादव, ऋषिकेश दसवते, सरफराज, राष्ट्रवादी कार्यकर्ते संतोष दोशी, कासारे आदी लराष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
ना. अब्दुल सत्तार यांचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेस माणगांव तर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी. तसेच ना. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करत पो. नि. राजेंद्र पाटील यांना माणगांव राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले.

.jpeg)

0 टिप्पण्या