पन्हळघर खुर्द शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख पदी राजेंद्र शिंदे यांची नियुक्ती.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव- दि. २०- माणगांव तालुका सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या लोणेरे मतदारसंघातील पन्हळघर खुर्द या गावचे शाखाप्रमुख पद रिक्त झालेल्या शाखाप्रमुख पदी राजेंद्र शिंदे यांची नियुक्त्यी करण्यात आली असल्याचे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे यांनी सांगितले. त्यानी पुढे सांगितले की, राजेंद्र शिंदे हे सेनेचे तरुण तडफदार युवा व होतकरू नेतृत्व व माजी उपसरपंच आहेत. त्यांनी बरेच वर्ष पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून राजेंद्र शिंदे यांची पन्हळघर खुर्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीपत्र देखील त्यांना देण्यात आले आहे.
सदर नियुक्ती पन्हळघर खुर्द शिवसैनिकांच्या मागणी नुसार रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम व जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या आदेशानुसार व तालुका प्रमुख गजानन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे यांनी केली असल्याचे सांगितले आहे.
तसेच पक्षानी दिलेल्या या पदाचा वापर आपण पक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रात निष्ठेने राबविणार, तसेच सामन्यजनते पर्यंत पोहचवून आपल्या कामात कसल्याही प्रकारचा गैर वापर करणार नाही. सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न करु कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही. मराठी बांधवांना भगिनींनी आणि मातांना अभिमान वाटेल असे काम करणार असल्याचे मत नवनिर्वाचित शाखाप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. तर मौजे पन्हळघर खुर्द ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ कडून व कट्टर शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या वतीने या विभागात मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.



0 टिप्पण्या