शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा संघटक पदी श्रीधर उर्फ संजय घोसाळकर यांची निवड
पोलीस प्रवाह न्यूज
राज्यात चाललेल्या मोठ्या राजकीय घडामोडींचे पडसाद सर्व जिल्ह्यात तसेच सर्व विधानसभा क्षेत्रात उमटले आहेत .शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) संघटनेमध्ये ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीची उलथापालथ झाली असून महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा संघटक पदाची जबाबदारी श्रीधर उर्फ संजय घोसाळकर यांच्यावर संघटनेने सोपवली आहे. एक ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला संधी संघटनेने उपलब्ध करून दिली आहे.
शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम व दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र देऊन जाहीर केले. गेले ३० वर्षे राजकीय जीवनात प्रवास करत असताना बहुजन समाजाचे नेते म्हणून एक संयमी, मितभाषी व जिथे अन्याय होत असेल तिथे आक्रमक चेहरा म्हणून त्यांनी आपल्या कामाची चांगल्या प्रकारे छाप विभागात तसेच रायगड जिल्ह्यात उमटवली आहे. प्रशासनाचा गाढा अभ्यास व प्रशासनावर त्यांची नेहमीच पकड राहिलेली आहे. पक्ष बांधणी तसेच उदयनमुख अनेक तरुणांना संधी देत जुन्या कट्टर शिवसैनिकांना मानसन्मान देखील मिळवून दिला असल्याने सर्वांच्याच मनात आपली छबी निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीने विभागात तसेच विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



0 टिप्पण्या