मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान तर्फे पन्हळघर गडावर साफसफाई

मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान तर्फे पन्हळघर गडावर साफसफाई


पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव-दि. २०-  माणगाव तालुक्यातील लोणेरे विभागातअसलेल्या किल्ले पन्हळघर गडावर मावळा  स्वराज्याचा प्रतिष्ठान तर्फे साफसफाई मोहीम राबविण्यात आली. पन्हळघर गडावर गेली दोन वर्ष मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान तर्फे संवर्धन मोहीम राबविण्यात येतात. दि २० नोव्हेंबर  रोजी मोहीम क्र.०७ राबविण्यात आली. या मोहिमेत गडावरील टाके क्र. ७ पूर्ण मातीच्या गाळाने भरलेले होते.  तो गाल साफ करण्याचे काम या मोहिमेत करण्यात आले.  अजून बऱ्याच प्रमाणात गाल या टाक्यांमध्ये आहे. हे टाके जून महिन्याच्या आत पूर्ण गाल मुक्त होईल असे सांगण्यात आले. या मोहिमेला ५० ते ६०  सभासदांनी सहभाग घेतला होता.

या मोहिमेत गडावर जाणारी पाय वाट गवताने दिसेनासी झाली होती.  ती वाट पूर्णपणे साफ कारण्यात आली. जेणे करून गडावर येणाऱ्या पर्यटकांना रस्ता सापडेल. व बाकीच्या ज्या पाण्याच्या टाक्या होत्या, त्याच्या बाजूला आलेले गवत सुद्धा सफाई कारण्यात आले.

 किल्ल्याचे वैभव लवकरात लवकर परत आणण्याचे काम मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान टीम कडून केले जात आहे.  या किल्ल्याचा श्री शिवकाळात उपयोग स्वराज्याची राजधानी श्री दुरदुर्गेश्वर रायगड संरक्षनासाठी, टेहळणी साठी उपयोग केला जायचा. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या