चक्क माणगांव तलाठी भवन कार्यालयात चोरी
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. ७ - माणगांव शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी माणगांव शहरात सहा घर फोडून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. आत चक्क माणगांव तलाठी भवन कार्यालयात चोरी झाली असल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. ५ नोव्हेंबर सायंकाळी ६ ते ७ नोव्हेंबर सकाळी १०.१५ वा. च्या दरम्यान अज्ञात चोराने माणगांव शहरात कचेरी रोडवर असलेल्या तलाठी भवन कार्यालयाचा दरवाजा तोडून चोरी केली आहे. यामध्ये चोराने १५००० रु. किमतीचा तलाठी प्रियांका मॅडम यांचा डेल कंपनीचा लॅपटॉप व तलाठी मोराळे यांचे रु. ३०००० किमतीचे दोन लॅपटॉप तसेच तलाठी यांची बॅग व त्यातील कागदपत्रे लंपास केली आहेत.
या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ३२३/२०२२ भा. दं. वि. सं. क. ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. किर्तीकुमार गायकवाड करीत आहेत.


0 टिप्पण्या