तटकरे कुटुंब जनतेची दिशाभूल करतो- जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर

 तटकरे कुटुंब जनतेची दिशाभूल करतो- जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर

माणगावमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद

पोलीस प्रवाह न्यूज

माणगाव- दि.- ४- श्रीवर्धन १९३ विधानसभा मतदारसंघाकरिता ६ कोटी रुपयांचा विकासनिधी माणगाव म्हसळा, श्रीवर्धन, तळा तालुक्यातील अंतर्गत ग्रामीण व नागरी विभागाकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व विधीमंडळ शिवसेना पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून वर्ग झाल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना व युवासेना दक्षिण रायगड पदाधिकारी यांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी माणगाव मध्ये पत्रकार परिषद घेतली. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा बाळासाहेबांच्या शिवसेनेने दत्तक घेतला आहे. मागील काही काळात  श्रीवर्धन मतदारसंघावर विकासकामांच्या बाबतीत अन्याय झाला आहे. तरी सध्या ६ कोटी व जलजीवन मिशन अंतर्गत खूप सारा पाणीपुरवठा योजनांसाठीचा निधी हा नाम. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. त्यावेळी पण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील होते आणि आता ही तेच आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. आणि आता त्या कामाकरिता निधी पुन्हा मंजूर करण्यात येत आहे. मात्र तटकरे कुटुंब ही ह्या कामांची भूमीपूजने व उदघाटने करून ही कामे आम्हीच केली असल्याचा दावा करत जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप खासदार तटकरे कुटुंबावर जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेतून केला. 

 

या पत्रकार परिषदेस बाळासाहेबांची शिवसेना संपर्क प्रमुख अरुण चाळके, द. रायगड  जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, युवसेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, तालुका प्रमुख ऍड महेंद्र मानकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवर, उपतालुका प्रमुख प्रशांत अधिकारी, तालुका सचिव प्रसाद जाधव, निजामपूर विभाग प्रमुख मनोज सावंत, युवासेना तालुका सचिव जितेंद्र तेटगुरे, इंदापूर शहर प्रमुख दिलीप नवगणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख उदय डाल आदी उपस्थित होते.

 

तसेच म्हसळा तालुक्यातील आंबेत विभाग खाडीपट्टा व संदेरी ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजने अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही नळपाणी योजनेचे कुणीही नारळ फोडले तरी आणि ना. गुलाबराव पाटील यांचा फोटो कुणाच्याही बॅनर वर असला तरी काम हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आहे असे उद्गार काढत घोसाळकर यांनी आंबेत खाडीपट्यातील जलजीवनमिशन अंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या श्रेय वादावरून निर्माण झालेल्या वादावर अजून एक तोफ डागली आहे.

या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले तालुका संपर्क प्रमुख अरुण चाळके म्हणाले की, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाकरिता भरघोस निधी हा बाळासाहेबांची शिवसेना व भाजप सरकारने मंजूर केला आहे. आ. भरत गोगावले आणि ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना ३ आमदार व भाजप चे ३ आमदार मिळून सरकारच्या मार्फत एकही गाव खेडे वाडी विकासापासून वंचित राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला. तसेच या पत्रकार परिषदेस उपस्थित असणारे माणगाव नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार म्हणाले की, नगरपंचायत करिता जेवढा विकासनिधी आला नव्हता त्यापेक्षा अधिक निधी हा ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. भरत गोगावले, शिवसेना नेते ऍड. राजीव साबळे यांच्यामाध्यमातून उपलब्ध झाला आहे. त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. माणगांवात आलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहनाचे पूर्ण श्रेय हे आम्ही सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे व आ. गोगावलेना देत नगराध्यक्ष पोवार यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

या पत्रकार परिषदेत युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे म्हणाले की, आता विरोधकांनी केवळ भूमिपूजन आणि उदघाटने यांचे नारळ आणि मुख्यमंत्री ना. एकनाथ  शिंदे यांच्याकडून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाकरिता येणारा विकासनिधी याचे आकडे मोजत बसावे. तसेच आ. गोगावले यांनी यापूर्वीच रायगड पालकत्व स्वीकारले आहे. आणि आगामी काहीच दिवसांत आमदार भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असतील असा आत्मविश्वास विपुल उभारे यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या