माणगांव पोलिसांची गावठी हातभट्टीवर धाड

 माणगांव पोलिसांची गावठी हातभट्टीवर धाड

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पो. नि. राजेंद्र पाटील यांच्यासह त्यांची टीम सदैव तत्पर असते. माणगांव पोलीसांनी गावठी हातभट्टीवर धाड टाकली असून   माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. १९ नोव्हेंबर रोजी ८.४५ वा. च्या सुमारास मौजे साई कोंड गावच्या हद्दीत नदीकिनारी आरोपी मारुती कृष्णा हिलम, वय ३० वर्ष, रा. काकल आदिवासी वाडी याने विनापरवाना गैरकायदा गावठी हातभट्टी रचून त्याखाली चूल पेटवून दारू गाळत असताना व नवसागर मिश्रित रसायन झुडपात ठेवलेला मिळून आला.

या धाडीत पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, स. फौ. भोजकर, पो. ना. मिलिंद खिरीट यांनी कामगिरी बजावली. या धाडीत २०२० रु. किमतीची सफेद रंगाचा प्लॅस्टिक कॅन त्यात गावठी हातभट्टी दारू, १०००० रु. गूळ नवसागर मिश्रित ५०० लिटर, २०० रु. अल्युमिनियम टोप असा एकूण १२२२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या