पोलीस भरती प्रशिक्षण शिबीरास माणगांवात उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव-दि. ५- रायगड पोलीस, पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत माणगांव येथे आयोजित करण्यात आले. पहिल्यांदाच जिल्ह्यात, रायगडचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाच्या वतिने अशा प्रकारचे पोलीस भरतीपूर्व तयारी आणि प्रोत्साहनपर शिबीर राबविण्यात आले. माणगांव, तळा, गोरेगांव मधिल जवळपास शेकडो प्रशिक्षणार्थींची लक्षणिय उपस्थिती होती. पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या माणगांव, तळा, गोरेगाव तालुक्यातील सर्व मुला-मुलींना या प्रशिक्षण शिबीराचा लाभ मिळाला. हे शिबीर अशोक दादा साबळे हायस्कूल माणगाव येथे घेण्यात आले.
यावेळी रायगड पोलीस अधिकारी वर्गाकडून भरती बाबत मार्गदर्शन व्यायामाचे महत्त्व, भरतीपूर्वक कागदपत्र पडताळणी व माहिती व भरती प्रक्रिया जाहिरात, संवर्गप्रमाणे पोलीस भरती, उमेदवार विभागणी माहिती, शारीरिक चाचणी पात्रते बाबत मार्गदर्शन तसेच मैदानी परीक्षा बाबत तज्ञांचे मार्गदर्शन यामध्ये सोळाशे मीटर, शंभर मीटर धावणे, गोळा फेक, पोलीस भरती लेखी परीक्षा बाबत तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना चहा, नाश्ता व पाणी, भोजनाची व्यवस्था देखिल करण्यात आली होती. तसेच प्रशिक्षण शिबिरात विशेष काळजी घेत रुग्ण-वाहिका देखील सज्ज ठेवण्यात आली होती. हे शिबीर सहा.पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनात यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील, तळा पो.नि. गोविंद ओमासे, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीकृष्ण नावले व माणगांव पोलीसांनी खुप मेहनत घेतली.
तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांनी आपल्या खास शैलीत मुलांशी संवाद साधला, व भरतीला कसे सामोरे जावे या विषयी मार्गदर्शन केले. तसेच पोलीस निवास साबळे यांनी प्रत्यक्ष भरती प्रक्रियाच समजावुन दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश अस्वर यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत शिबीराची संपूर्ण जबाबदारी पेलताना मुलांना अनेक बारकावे समजाविले. तळा तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक ओमासे यांनीही पोलीस भरतीची सुवर्णसंधी घ्या, व्यसन मुक्त, शिस्तबध्द राहुन आळस झटकुन पोलीस भरती व्हा! आपल्या वरिष्ठांचे आदेश पालन करुन प्रामाणिकपणे जनतेची सेवा करा! असा मोलाचा सल्ला दिला. या शिबिरात रायगड भूषण जेष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर यांनीही पोलीसदल आणि शिस्त, सामाजिक जबाबदारी या विषयी खुमासदार संवाद साधला.
या शिबीरात पोलीस भरतीचे वेळी गोळाफेक कशी करावी याचे प्रात्यक्षकही पोलीस ॲकॅडमी भरतीचे मार्गदर्शक परेश कोटकर, प्रितीश वाडकर, विद्या खिडबिडे यांनी शाळेच्या भव्य पंटागणात करुन दाखविले, प्रत्यक्ष गोळाफेकही घेण्यात आली. यामध्ये मुलिंचा उत्साह आणि उर्जा वाखाणण्याजोगी होती. मुलिंचीही 'हम भी कुछ कम नही' अशी तयारी पाहुन उपस्थित पोलीस अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. माणगांव, तळा, गोरेगांव मधिल जवळपास दोनशे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची लक्षणिय उपस्थिती दिसुन आली. पोलीस उप निरिक्षक अनंत पवार, सहा. उप निरिक्षक ज्ञानदेव ढोबळे, पो.शि. रामनाथ डोईफोडे, अनिल रिटे, सुग्रीव मुंडे, अमोल पोंधे, विकास ढाकणे यांनी विशेष मेहनत घेतली.





0 टिप्पण्या