वास्तुतज्ञाचा मृतदेह अखेर तब्बल सतराव्या दिवशी शोधण्यात पोलीसांना यश
पोलीस प्रवाह न्यूज
पिंपरी-दि. ५- निलेश दत्तात्रय वरघडे, वय ४३ वर्षे, रा. चाळ नं. बी / ८२ खोली नं. २४, सुप्पर इंदिरानगर, माजी नगरसेविका कुंभारबाई यांचे घरा समोर बिबवेवाडी पुणे हे घरी परत न आल्याने श्रीमती रूपाली रूपेश वरघडे यांनी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे मनुष्य मिसींग रजि. नं.६० / २०२२ अन्वये नोंद केली होती.
सदर मनुष्य मिसींगचा तपास स.पो. नि. प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक संजय आदलिंग व तपास पथकातील स्टाफ असे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना सदर मनुष्य मिसींगचे तपासामध्ये मिसींग व्यक्ती ही दिपक जयकुमार नरळे याचे बरोबर गेला होता. दिपक नरळे याने स्वतःचा मोबाईल फोन बंद करून आपले अस्तित्व लपविलेने त्याने अपहृत इसमा कडील दागिण्याचे मोहापोटी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण केले बाबत श्रीमती रूपाली वरघडे यांनी तक्रार दिली असून त्याबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १८७ / २०२२ भा.द.वि. कलम ३६४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये संशयीत आरोपी दिपक जयकुमार नरळे, वय २९ वर्षे, त्यास शिताफीने पकडून तपास करता त्याने त्याचा साथीदार नामे रणजीत ज्ञानदेव जगदाळे, वय २९ वर्षे याचे बरोबर कट करून निलेश वरघडे यास कॉफीमधून झोपेच्या गोळ्या देवून नंतर त्याचा दोरीने गळा आवळून मृतदेह पोत्यात भरून तो नीरा नदी, सारोळा पुलावरून नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेचे निष्पन्न झाले असून वर नमुद दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयात वापरलेली इर्टीगा कार, दोन दुचाकी वाहने तसेच अपहृत इसमाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल असा एकूण १९ १६,४००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी हे अपहृत निलेश वरघडे याचा दोरीने गळा आवळून मृतदेह पोत्यात भरून तो नीरा नदी, सारोळा पुलावरून नदीत टाकून पुरावा नष्ट केला असल्याच सांगत असल्याने अपहृत निलेश वरघडे याच्या मृतदेहाचा निरानदीत युध्दपातळीवर शोध मोहिम सुरु केली होती. तब्बल १७ दिवसांनी निलेश वरघडे याचा मृतदेह सारोळा येथील निरा नदीत शोध घेण्यास बिबवेवाडी पोलीसांनी, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यु टीम, भोईराज आपत्ती संघ भोर, वाईल्ड वेस्ट अॅडव्हेंचर कोलार्ड रत्नागिरी, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य, स्थानिक मच्छीमार व शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद पटेल यांनी सातत्याने सचोटीने जिद्द न हारता निरा नदी पात्रात शोध मोहिम राबवत मृतदेह शोधण्यात यश मिळविले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील परिमंडळ ५ पुणे शहर व मा. सहा. पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक संजय आदलिंग, विवेक सिसाळ, पोलीस अमंलदार सहा पोलीस उप निरीक्षक रविंद्र राऊत, पोलीस हवालदार शाम लोहोमकर, देशमाने, संतोष जाधव, सतिश मोरे, तानाजी सागर, शिवाजी येवले, अतुल महांगडे, प्रणव पाटील, अभिषेक धुमाळ व अनिल डोळसे, ज्ञानेश्वर डाके, नितीन धोत्रे, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यु टीम भोई राज आपत्ती संघ भोर, वाईल्ड वेस्ट अॅडव्हेंचर कोलार्ड रत्नागिरी, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य स्थानिक मच्छीमार व शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद पटेल यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, प्रविण काळुखे हे करीत आहेत.



0 टिप्पण्या