माणगांव पोलिसांचा स्तुत्य उपक्रम पोलीस ठाणे येथे बसवली सॅनिटरी नॅपकिन मशीन

माणगांव पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

पोलीस ठाणे येथे बसवली सॅनिटरी नॅपकिन मशीन

पोलीस प्रवाह न्यूज 

 माणगांव पोलीस नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. अनेक सामाजिक उपक्रम माणगांव पोलिसांतर्फे राबविले जातात. असाच एक स्तुत्य उपक्रम माणगांव पोलीसांनी राबविला असून माणगांव पोलीस ठाणे येथे सॅनिटरी नॅपकिन मशीन बविण्यात आले आहे.

माणगांव पोलीस व ह्युमॅनिटी युनायटेड फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ नोव्हेंबेर रोजी रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाणे येथे  मासिक पाळीच्या स्वच्छता मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यात आले.            मासिक पाळी च्या संदर्भात नेहमीच लाज, संकोच बाळगल्याने महिला व युवतींना अनेक गंभीर आणि इतर समस्याना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीतील मनातील लज्जा, संकोचची जागा गर्व आणि आनंदात बदलण्यासाठी ह्युमॅनिटी युनायटेड फेडरेशन द्वारा अभियान सुरू केले आहे. 

यावेळी पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उदघाटनवेळी डॉ. साकोलेकर, म. पो. उप निरीक्षक अस्मिता पाटील, ह्युमॅनिटी फेडरेशन संस्थापक प्रशांत जोशी, कोकण विभाग अध्यक्ष सचिन शिंदे, पो. शि. रामनाथ डोईफोडे, शाम शिंदे, पो. ह. ओमले, मदने, महिला दक्षता समिती सदस्य मिरजकर, तुलसा पवार, किशोरी हिरवे, विद्यार्थीनी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स मोफत वाटप करण्यात आले. पाच रुपयाचा शिक्का मशीनमध्ये टाकून सॅनिटरी नॅपकिन मशीनमधून बाहेर येते. या सेवेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन माणगांव पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या