रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि.१५- केंद्र शासनाने क्रीडा विभागाचे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. "पॅरा शूटिंग" या खेळ प्रकारात क्रीडा मार्गदर्शन केले असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविल्यामुळे उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात येणार आहेत. सुमा शिरूर यांचे रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी अभिनंदन केले. रायगड जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्पद असून सर्व स्तरातून सुमा शिरूर यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




0 टिप्पण्या