माणगांव पोलिसांनी मोबाईल दिला शोधून

 माणगांव पोलिसांनी मोबाईल दिला शोधून

 पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. - माणगांव पोलिसांची दमदार कामगिरी सुरूच आहे. माणगांव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माणगांव पोलीस नेहमी तत्पर असतात. अशाच एकाचा रेल्वे ट्रॅक दरम्यान पडलेला मोबाईल पोलीसांनी शोधून दिला आहे.

  दि. ३० ऑक्टोबर रोजी इरफान काशीम शेख रा. टागोरनगर, विक्रोळी, मुंबई यांचा ४०००० रु. किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल गोवा ते मुंबई प्रवासादरम्यान भादाव गावच्या हद्दीत पडला होता. तसे त्यांनी माणगांव पोलिसांनी कळविले होते. सहा. फौजदार कदम व पो. शि. मिसाळ यांनी साबळे हायस्कुल ते भादाव असे २ किमी रेल्वे ट्रॅकवर चालत जाऊ शोध घेतला असता इरफान यांचा मोबाईल भादाव गावच्या हद्दीत रेल्वे पटरीवर मिळून आला. इरफान यांना मोबाईल वरून तसे कळविले असता दि. ३१ ऑक्टोबर रोजी माणगांव पोलीस ठाणे येथे पो. नी. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. माणगांव पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल इरफान यांनी त्यांचे आभार मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या