करमाळाकरांनी लुटला दिवाळी पहाट या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद
पोलीस प्रवाह न्यूज
करमाळा : दि. २६ - बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी प्राचार्य श्री गणेश भाऊ करे पाटील यांच्या यश कल्याणी परिवारातर्फे पुणे येथील प्रसिद्ध पार्श्वगायक प्रवीण कुमार अवचर यांच्या स्वर तेजोमय पहाट या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या प्रांगणात घेण्यात आला यावेळी पार्श्वगायत प्रवीण कुमार अवचर यांच्या द म्युझिक कलर्स आर्केस्ट्रा ग्रुप मधील एक से बढकर एक कलाकारांनी आपल्या गायनाने व वादनाने प्रेक्षकांची मने लुटली यावेळी भावगीत भक्तिगीत लावणी अभंग कव्वाली विविध प्रकारच्या गीतांची प्रस्तुती करण्यात आली पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांनी गायलेल्या चढता सुरज धीरे धीरे या कव्वालीला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे गायिका मंजुषा देशपांडे यांनी गायलेल्या चंद्रा या लावणीला व त्यांना साथ संगत करणाऱ्या वादकांची रसिक स्रोतांनी भरभरून कौतुक केले, गायक राजू जाधव यांनी गायलेले प्रभू तू दयाळू या गीतालाही प्रेक्षकांनी मोठी दाद् दिली, पुण्यातील सुप्रसिद्ध टीव्ही अँकर रत्ना दहिवलेकर यांच्या निवेदनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले, वादकांमध्ये प्रवीणकुमार यांच्या ग्रुपचे म्युझिक अरेंजर सईद बाबा खान, बासरी वादक भालचंद्र अडसूळ, ऑक्टो पॅड वादक डॅनियल निकाळजे, ढोलक वादक जाकीर शेख ,व तबलावादक पंडित गोविंद जी कुडाळकर महाराज यांनी केलेल्या इन्स्ट्रुमेंटल सोलो वादनांना प्रेक्षकांनी भरभरून टाळ्यांची दाद दिली.
पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांनी लिहिलेल्या करमाळा येथील आई कमला भावाणी माते चे महात्म्य सांगणारे कमला देवीच्या दर्शनाला चल, हे गीत प्रफुल्ल दामोदरे ,प्रवीण कुमार ,आणि सागर खरात व नासीर भाई शेख, यांनी सुरू करताच प्रेक्षकांनी आई कमला भवानी मातेच्या नावाचा जल्लोष केला ,त्याचबरोबर यश कल्याणी संस्थेचे चे कर्मचारी श्री दादा पिसे यांनी लिहिलेले प्रा, गणेश भाऊ करे पाटील यांच्या कार्याच्या गौरव गीताला प्रेक्षकांनी प्रचंड साथ दिली.
यावेळी कार्यक्रमानंतर यश कल्याणी परिवारचे संस्थापक प्रा,गणेश भाऊ करे पाटील यांचे सह विद्या विकास मंडळाचे श्री विलासरावजी घुमरे , अॉड श्री बाबुरावजी हिरडे साहेब ,गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत साहेब चौधरी सर, पुढे प्रभात न्यूज च्या कु पियुशा अवचर, सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल आधी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कलाकारांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले ,तसेच विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवणारे विद्यार्थ्यासह माजी सैनिक सह विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या नावलौकिक मिळवणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाला विशेष करून करमाळ्यातील प्रतिष्ठित व्यापारी शिक्षक उच्चशिक्षित ,राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री शेखर जोगळेकर यांनी केले.




0 टिप्पण्या