पोस्को कंपनीतर्फे मोफत मोतिबिंदू तपासणी शिबिर संपन्न
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. ०१ नोव्हेंबर- विळे भागाड औदयोगिक क्षेत्रात असलेल्या पोस्को कंपनीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. पोस्को कंपनीच्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत दि. १६ ते १८ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
भागाड ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रातील भागाड, तासगांव आणि येलावडे यथील २०१ जणांची प्राथमिक तपासणी माणगांव येथील प्रशिक्षित तज्ञांच्या सहायाने करण्यात आली. सदर तपासणीच्या अहवालानंतर ज्यांची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण होण्याकरिता ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवला. या आधी ही दोनवेळा अशाच प्रकारच्या तपासणी शिबिराचे आयोजन कंपनीतर्फे करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण १११ जणांची शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. मोतीबिंदूमुळे दृष्टीतील कमतरता अनेकांना अपंग / अवलंबित्व आणते. अशा स्थितीत कंपनीने यासंदर्भात घेतलेले हे पाऊल अभिनंदनीय असुन शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांनी पोस्को कंपनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.




0 टिप्पण्या