डॉ. सागर काटे म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी पदी
राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय कर्तव्यात कठोरपणा व शिस्त आणणारे डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नव्या फतव्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. त्याचाच भाग म्हणून रायगड जिल्ह्यांतही आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्यावेळी रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे ह्या धोरणानुसार गेले २ ते ३ वर्ष रिक्त असलेले म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ सागर काटे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
डॉ. सागर काटे हे कोलीवली नेरळ ता. कर्जत येथील रहिवाशी असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण अहमदनगर येथे पूर्ण झाले. त्यानंतर ग्रामीण भागात आरोग्य सेवा समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ, प्रा. आ. केंद्र कोकबन, प्रा. आ. केंद्र म्हसळा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कोविड काळातील म्हसळा येथील कार्याची दखल घेऊन मा. मुख्यकार्यकारी अधिकारी आणि मा. जिल्हा आरोग्य अधिकारी रा. जि. प. अलिबाग रायगड यांनी त्यांचेवर जिल्हा समन्व्यक ( समुदाय आरोग्य अधिकारी), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ( ग्रामीण आरोग्य अभियान NHM ) अशा विविध जबाबदाऱ्या दिल्या. डॉ काटे यांना नुकताच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकेल्याबद्दल साई आधार सोशल हेल्प फॉउंडेशन, नाशिक यांचे कडून महाराष्ट्र गौरवपुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक १८ आक्टोबर पासून त्याच्याकडे म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची म्हसळा तालुक्यात नेमणूक झाल्यामुळे तालुका आरोग्य विभागांतील मरगळ झटकली जाईल अशी चर्चा सुरु झाली.




0 टिप्पण्या