यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेतर्फे दिवाळी पहाट व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेतर्फे  दिवाळी पहाट व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन



पोलीस प्रवाह न्यूज

करमाळा येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.  गणेश भाऊ करे पाटील संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. यंदा बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त करमाळा शहरातील रसिक श्रोत्यांसाठी पुणे येथील पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

यामध्ये भावगीत, भक्ती गीत, भजन, नाट्यगीत, कव्वाली, लावणी, अभंग आणि हिंदी चित्रपट गीतांचा आनंद घेता येणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन पुणे येथील प्रसिद्ध अशा टीव्ही अँकर  रत्ना दहिवलेकर या करणार आहेत. सोबत जागतिक दर्जाचे गायक, गायिका व जागतिक दर्जाचे वादक या मैफिलीला संगीताची साथ देणार आहेत.  यश कल्याणी परिवारातर्फे विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या गुणवंताना पुरस्कार देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम करमाळा येथील यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था पुणे रोडचे प्रांगणात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा गणेश भाऊ करे पाटील यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या