सातत्य आणि कठोर परिश्रम हाच यशाचा मार्ग - स्वप्निल माने आय.पी.एस.

सातत्य आणि कठोर परिश्रम हाच यशाचा मार्ग - स्वप्निल माने आय.पी.एस.

पोलीस प्रवाह न्युज 

कोल्हापूर : दि. १६ -  सातत्य आणि कठोर मेहनतीच्या जोरावरच आपण स्पर्धा परीक्षेत आपण यशस्वी होऊ शकतो.ध्येय निश्चित करणं संधी ओळखणं सोबतीनं अपयश आलं योग्य पर्याय कसा असावा त्याचबरोबर त्याग आणि पुर्ण समर्पण दिल्यास यश नक्की मिळेल असे मनोगत "स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना" ह्या विषयावर बोलताना स्वप्निल माने नवं नियुक्त (आय.पी.एस) यांनी व्यक्त केले.ते डी.आर.माने महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ कागल यांच्या वतीने आयोजित व्याख्यान मध्ये येथे बोलत होते.

प्रा.संतोष जेटीथोर यांनी स्वागत प्रास्तविकामध्ये माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून केलेल्या उपक्रम आढावा घेतला तर सचिव विवेक पोतदार यांनी पाहुणे ओळख करून देऊन पुढे असेच उपक्रम राबवु असा विश्वास दिला तर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नेताजी बुवा यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न व विविध उपक्रमांसाठी आपण नेहमीच पुढाकार घेऊ असे मनोगत व्यक्त केले.

व्याख्याना नंतर चर्चा सत्र संपन्न झाले ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वप्निल माने यांच्याशी संवाद साधला.ह्यावेळी प्रा डॉ.आदिनाथ गाडे,आबासाहेब चौगले इ.उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले यांनी आपण स्पर्धा परीक्षेचे तयारी करण्या विद्यार्थ्यांना हवं ते सहकार्य करू असा विश्वास दिला.कार्यक्रमाचे आभार प्रा.श्रीनिवास पाटील यांनी तर सुत्रसंचालन विनायक सातुसे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या