डी. आर. माने महाविद्यालय कागल येथे वाचन प्रेरणा दिन संपन्न..
पोलीस प्रवाह न्युज
कागल दि .१५ - : डी.आर. माने महाविद्यालय, कागल येथील वाचनकट्टा विभागाच्या वतीने दि .१५/१०/२०२२ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रवीण चौगुले यांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय या विषयावरती विद्यार्थ्यांना संबोधित केले तसेच जनरल विभागाकडे कार्यरत असणाऱ्या प्रा.जयश्री जगताप यांनी रास या आत्मकथनाचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
या वेळी प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी आजच्या युवकांच्या समोर आदर्श म्हणून एपीजे अब्दुल कलाम कसे आहेत तसेच भारत महासत्ता होण्यासाठी आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत बनवण्यासाठी जबाबदारी खऱ्या अर्थानं आजच्या युवकाची आहे. असा विचार आपल्या भाषणामध्ये मांडला. तर रास या आत्मकथनावर प्रा. जयश्री जगताप यांनी सुमा करंदीकर यांचे भावविश्व तसेच विंदा करंदीकर यांचा असणारा अवलिया स्वभाव एक साहित्यिक म्हणून त्यांची होत असणारी वाटचाल आणि एका साहित्यिकाची खंबीर पत्नी संसार कसा सुखाने करते कितीतरी अडचणी आल्या तरी सुद्धा त्या सर्व दुःखद प्रसंग आणि घटनांना कशा धैर्याने सामोरे गेल्या, तसेच विंदा करंदीकर आणि कागलचा असणारा अनुबंध त्याचप्रमाणे विंदांच्यामुळे कागलला लाभलेला साहित्यिकांचा सहवास त्यांनी रास या आत्मकथनाच्या आधारे विद्यार्थ्यांसमोर उलघडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत मराठी विभाग प्रमुख आणि वाचनकट्टा समन्वयक प्रोफेसर डॉ. नीला जोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार विनायक खोत यांनी मांडले. कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी तंत्र सहाय्यक म्हणून संदीप वाडीकर यांनी काम पाहिले. तर सूत्रसंचालन डॉ. सरस्वती गायकवाड यांनी केले. यावेळी प्रा सचिन कांबळे, डॉ.लखन भोगम , प्रा. संगीता डोणे, प्रा. संगीता एकसबेकर, अँड. नीता मगदूम हे उपस्थित होते .



0 टिप्पण्या