माणगांवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल मोर्चा ढाल पाठीवर घेऊन उपयोग नाही, जनता तुमच्या ढुंगणावर लाथा मारेल

माणगांवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल मोर्चा

ढाल पाठीवर घेऊन उपयोग नाही, जनता तुमच्या ढुंगणावर लाथा मारेल

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव-दि. १३-  महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय उलटापालट सुरू आहे. आधी महाराष्ट्रात शिवसेना एकच पक्ष होता. त्यातील एक गट बाहेर पडल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिल्यानंतर मशाल चिन्ह दिले. त्याच स्वागत करण्यासाठी माणगांव तालुक्यात दि. १२ ऑक्टोबर रोजी बालाजी कॉम्प्लेक्स ते मोर्बा रोड मशाल मोर्चा काढण्यात आला.  

यावेळी तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, नगरसेवक अजित तार्लेकर, माजी नगरसेवक वसई विरार सुधीरभाऊ  सोनावणे, उपतालुका अधिकारी नंदुराज वाढवळ, शहर संपर्कप्रमुख विशाल घर्वे, संतोष पवार, शहर अधिकारी अजिंक्य जाधव, शाखाप्रमुख राजू चव्हाण, अभिजित घोणे, सागर गांधी, अविनाश मोंडे, संतोष कळंबे, तालुका संघटक लहू लुष्टे, हरदास शेडगे, गणपत शेडगे, प्रवीण पाटोळे, मिलिंद पंदेरे, गणेश निगडे, चंद्रकांत यादव, विलेपार्ले उपशाखाप्रमुख प्रकाश पालकर, अनिल पालकर, राजा बिरवाडकर, सिकंदर आमोणकर, नारायण पांचाळ, मोनिष टेंबे, राम गोरीवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  याच दिवशी सकाळी बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या ढाल तलवार चिन्हाचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले होते. 


मशाल मोर्चेवेळी ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ते म्हणाले की, ही मशाल क्रांतीची, दगदगती, अधांराला जाळणारी, प्रगतीकडे नेणारी, महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. संपूर्ण भारताचा व महाराष्ट्राचा कायापालट करण्याचे काम मशाल घेऊन आम्ही करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मशालीच्या प्रकाशाच्या जोरावर सर्व गडकिल्ले जिंकले. त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचा गड जिंकतील. ही मशाल प्रत्येकाच्या घरात, हृदयात तेवत ठेवण्याचे काम आम्ही शिवसैनिक करणार आहोत. शिंदे गटाला दिलेल्या चिन्हातील तलवार ही ईडीची तलवार असून ढाल ही भाजपची आहे. बाकी सर्व एकनाथ शिंदेंची उलाढाल आहे. पाठीवरती ढाल घेऊन काही उपयोग नाही जनता तुमच्या ढुंगणावर लाथा मारेल अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या