माणगांवात बाळासाहेबांची शिवसेना गटाचा जल्लोष ढालीने जनतेचे रक्षण करणार तर तलवारीने विरोधकांना चारिमुंडया चित करणार

 माणगांवात बाळासाहेबांची शिवसेना गटाचा जल्लोष

ढालीने जनतेचे रक्षण करणार तर तलवारीने विरोधकांना चारिमुंडया चित करणार .


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १२- महाराष्ट्र राज्यात गेली दोन महिने राजकारणात अनेक नाटकीय घडामोडी होत आहेत. शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. यात नेमकी शिवसेना कोणाची यावरून ठाकरे गट व शिंदे गट यांच्यातील वाद न्यायालयापर्यत पोहोचला. ऐन अंधेरी पोटनिवडणुकी वेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवले. त्यानंतर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व चिन्ह मशाल देण्यात आल्यानंतर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना व चिन्ह ढाल तलवार मिळाल्याने माणगांव तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना गटाने एकच जल्लोष केला.  

 यावेळी शिवसेना नेते ऍड. राजीव साबळे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके, युवासेनापप्रमुख विपुल उभारे,  तालुकाप्रमुख ऍड. महेंद्र मानकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, शहरप्रमुख सुनील पवार, उपतालुकाप्रमुख नितीन पवार, निजामपूर विभागप्रमुख मनोज सावंत, युवासेना महाड विधानसभा प्रमुख वैभव मोरे, युवासेना सचिव जितेंद्र तेटगुरे, तालुका सचिव प्रसाद जाधव, योगेश बक्कम, सदानंद लहाने, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत खालुबाज्याच्या ठेक्यावर जल्लोष साजरा करण्यात आला. मिळालेल्या ढाल तलवार चिन्हातील ढालीने शेतकरी, मजूर सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणार असून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना  तलवारीने उत्तरे दिली जातील व विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याचे काम तलवारीने करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधिमंडळ प्रतोद आ. भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना गटाला चांगले वातावरण आहे. ढाल तलवार ही निशाणी शिवकालीन असून ढाल तलवारीच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी हिंदुत्व निर्माण केले. त्याचप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना याच निशाणीच्या सहाय्याने महाराष्ट्रात इतिहास घडवेल. ही निशाणी घरोघरी पोहचविण्याचे काम आम्ही करणार असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजय आमचाच असेल असे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या