माणगांवात चाकरमान्यांकडून रेल रोको : पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर रेल्वे सोडली.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. ६ - माणगांव रेल्वे स्थानकावर दि. ६ सप्टेंबर रोजी परतीच्या चाकरमान्यानी जबलपूर एक्स्प्रेस रेल्वे रुळावर उतरून रेल्वे रोको केला. संध्याकाळ ४.३० वा च्या सुमारास आलेली वापी गाडी माणगांव रेल्वे स्थानक येथे थांबली. परंतु, रेल्वेमधील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाही. त्यामुळे सुरत वापी रिझर्वेशन तिकीट असलेल्या प्रवाशांना या रेल्वेमध्ये चढता आले नाही. त्यामुळे त्यांनी ४.४५ वा च्या सुमारास आलेली जबलपूर एक्स्प्रेस समोर उभे राहून रेल रोको केला.
याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स. पो. नि. लहांगे, पो. स. ई. गायकवाड, पो. उ. नि. अनंत पवार, पो. शि. शाम शिंदे, रामनाथ डोईफोडे, सचिन सोनकांबळे, पो. शि. निखिल सुर्ते आपल्या टीम सह रेल्वे स्थानक येथे तातडीने हजर झाले.



0 टिप्पण्या