कोल्हापूर सराफ व्यापारी संघा तर्फे भाविकाना "कोल्हापुरी साज, ठुशी व नथीचे" वाटप.
पोलीस प्रवाह न्यूज
कोल्हापूर : दि. २८ - जिल्हाधिकारी व प्रशासन यांनी या शारदीय नवरात्रौत्सवात बाहेरून येणाऱ्या भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी विविध भेट वस्तू देण्याचे विचाराधीन ठेऊन हा उपक्रम चालू करण्यात आला.
आज "जागतिक पर्यटन दिन" या निमित्ताने कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार व मान्यवरांच्या उपस्थितीत आई अंबाबाई मंदिर परिसरात गोल्ड प्लेटेड कोल्हापुरी साज, ठुशी व नथ" यांचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे सन्मानीय सभासद श्री. निशांत वाकडे रा. रविवार पेठ, कोल्हापूर यांनी कोल्हापुरी साज सराफ संघास भाविकांना भेट देण्यास म्हणून मदत केली, यावेळी निशांत वाकडे यांचा सहकार्य बद्दल सत्कार करण्यात आला
यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. राजेश राठोड, उपाध्यक्ष श्री. विजय हावळ, सचिव श्री. प्रीतम ओसवाल, श्री. तेजस धडाम, संचालक श्री. कुलदीप गायकवाड, श्री. किरण गांधी, श्री. अशोक ओसवाल, श्री. संजय रांगोळे, श्री. कुमार ओसवाल, श्री. सिद्धार्थ परमार, श्री. शिवाजी पाटील, श्री. विजयकुमार भोसले, श्री. भैरू ओसवाल, श्री. शितल पोतदार आदी उपस्थित होते.





0 टिप्पण्या