बिबट (वाघ) नखे प्रकरणातील उर्वरित २ आरोपी व बिबट नखे हस्तगत.

बिबट (वाघ) नखे प्रकरणातील उर्वरित २ आरोपी व बिबट नखे हस्तगत.


पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. २६ - माणगांव वनविभाग व पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत ४ आरोपींसह १० बिबट नखे पकडण्यात आली होती. उर्वरित २ आरोपींकडून दि. २५ सप्टेंबर रोजी आणखी ८ नखे हस्तगत करण्यात आली असून एकूण सर्व १८ नखे पकडण्यात माणगांव वनविभाग व पोलिसांना यश आले आहे. 

निजामपूर विभागातील कुंभार्ते गावच्या हद्दीत दि. २१ सप्टेंबर रोजी आरोपी मंगेश कुर्मे व नईम अजीज शेख यांना १० बिबट नखे विकत असताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. दि. २२ सप्टेंबर रोजी आरोपी दत्ता पवार व मंगेश पवार यांना पकडून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना वन कस्टडी देण्यात आली होती.  दि. २६ सप्टेंबर रोजी आरोपी क्र. ५ रमेश विष्णू जाधव, रा. खरबाची वाडी, ता. रोहा याच्याकडून ५ बिबट नखे व आरोपी क्र. ६ मारुती भिकाजी चव्हाण, रा. रेवेची वाडी, ता. रोहा याच्याकडून ३ बिबट नखे अशी एकूण १८ बिबट नखे हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी क्र. ४ मंगेश गिरज्या पवार  यांना न्यायालयाने १ दिवसाची वन कस्टडी दिली असून उर्वरित ३ आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  मृत बिबट्याचे शव, कातडे, दात, हाडे यांचा शोध लावण्याच्या अनुषंगाने पुढील तपास उपवनसंरक्षक रोहा आप्पासाहेब निकत, सहाय्यक वनरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल माणगांव अनिरुद्ध ढगे, वनपाल निजामपूर संजय चव्हाण करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या