प्रतिनिधी - पुणे
मा. श्री वैभव शाहूंराव फरतडे (पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख, MUL) यांच्या मार्गदर्शनानुसार मा. श्री. केडी उर्फ कुलदीप पाटीलसर (जिल्हाध्यक्ष- मराठा उद्योजक लॉबी पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी पत्रकार भवन, पुणे येथे दिमाखात आणि भरपूर उत्साहात पार पडली.
MUL पुणे विभागीय बैठकीस दौंड, नगर, शिरूर, चाकण, हडपसर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड, मावळ, हिंजवडी, कोथरूड व वारजे या भागातून बांधव आणि भगिनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी श्री. केडी पाटील यांनी MULच्या स्थापनेचा मूळ उद्देश, त्याची कार्यपद्धती, आजवरचा अनुभव व पुढील काळातील योजना याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. नंतर उपस्थित बांधवांनी स्वतःची व्यावसायिक ओळख करुन देत त्यांना भेडसावणाऱ्या समस्या व MUL मधून आलेले अनुभव व्यक्त केले.
पावसाचे वातावरण असून सुद्धा मोठ्या प्रमाणात सदस्य उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्व उपस्थित सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानून यापुढील बैठक ही 500 सदस्य संख्या असलेल्या हॉल मधेच पार पाडू असा सर्व सदस्यांनी संकल्प केला.
अल्प कालावधीत ठरलेल्या या बैठकीचे पुणे टीम ॲडमिन श्री. पवनभाऊ निकम यांनी उत्कृष्ट असे नियोजन केले, तसेच श्री. प्रदीपभाऊ गरड आणि श्री. विकासभाऊ गरड यांनी बैठकीसाठी हॉल उपलब्ध करून दिला.कार्यक्रमाचा समारोप श्री. विकासभाऊ गरड यांनी उपस्थितांचे आभार मानून केला.
याप्रसंगी MUL पुणे मुख्य महिला ॲडमिन सौ. कल्याणी बाराथे- खैरनार व ॲडमिन टीम मधील श्री. पवनभाऊ निकम, श्री. अविनाशभाऊ पडोळे, श्री. कानिफनाथभाऊ मांडगे, श्री. सतीशभाऊ काळभोर, श्री. लखनभाऊ सावंत तसेच नगर टीमचे श्री. अजिंक्यभाऊ गुळवे उपस्थित होते.




0 टिप्पण्या