कोल्हापूर - सिद्धनेर्ली मध्ये 75 संविधान प्रत वाटप ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

 सिद्धनेर्ली मध्ये 75 संविधान प्रत वाटप

७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त सिद्धनेर्ली गावामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम ग्रामपंचायत सिद्धनेर्ली यांच्यावतीने राबविण्यात आले. १३ ते १५ऑगस्ट या कालावधीमध्ये "हर घर तिरंगा" या उपक्रमांतर्गत संपूर्ण गावामध्ये ध्वज फडकवण्यात आला.

   त्याचबरोबर 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटना तसेच गणेश मंडळे यांना 'संविधान' प्रत देऊन हा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

   यावेळी ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रय पाटील,ग्रामसेवक तसेच सर्व सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या