प्रतिनधी - करमाळा
व्यापारी म्हणजे चोर आहेत का याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईचा भडका उडत आहे, अशातच वाढती बेरोजगारी आणि बाजारातील मंदीमुळे व्यापारी अक्षरशः धास्तावले आहेत, यातच जीएसटी वार्षिक कर दुकानातील कामगारांचे पगार, मुलांचा शिक्षणाचा खर्च, कौटुंबिक खर्च, अशा अनेक कारणामुळे व्यापारी अक्षरशः हैराण झालेले आहेत, एकीकडे केंद्र सरकारने लावलेले जीएसटी सारखे वेगवेगळे टॅक्स यामुळे व्यापाऱ्यांना मिळणारा नफा निम्म्यावरती कमी आला आहे, बाजारातील मंदीमुळे ग्राहकांची कमी आहे, गेली दोन-तीन वर्ष कोरोनामुळे सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे उद्योगधंद्यांवरती पण याचा परिणाम झालेला आहे, यातच व्यापार पेठेत वाढलेली दुकानांची स्पर्धा कापड दुकानदार असो किंवा हॉटेल व्यवसाय किंवा किराणा भुसार व्यापारी असो किंवा सोन्या-चांदीचे व्यापारी असो प्रत्येक व्यवसायामध्ये सध्या मंदी सुरू आहे ,केंद्र सरकार च्या वाढत्या जीएसटी मुळे मालाच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे, उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या सोनाराने एक लाखाचा सोनं ग्राहकाला विकल्यास सरकारला टॅक्स रुपाने साडे पंधरा हजार रुपये जातात, व व्यापाऱ्याला फक्त दीड हजार रुपये यातून फायदा होतो, मग प्रश्न हा आहे की व्यापाऱ्यांनी कमवायचं काय, दुकानातील स्टाफ, दुकानाचा मेंटेनन्स , वेगवेगळे दैनंदिन खर्च हे देणार कुठून, हे असे एक उदाहरण नसून अनेक उदाहरणं आपणास पाहायला मिळतील, नुकतीच केंद्र सरकारने पॅकिंगच्या वस्तूवर जीएसटी मध्ये वाढ केली यामुळे दुकानदाराचा नफ्यामध्ये मोठी घट झालेली आहे, दुकानदारी टिकवण्याचं आवाहन आज प्रत्येक व्यापाऱ्याला आहे ,बरेच व्यापारी तर व्याजाने पैसे काढून आपली दुकानदारी चालवत आहेत, अशातच प्रचंड महागाई वाढल्यामुळे ग्राहक पूर्वीसारखं खरेदी करत नाहीत ,हीच परिस्थिती प्रत्येक दुकानदाराची आहे, काही व्यापाऱ्यांचा तर दिवसभराचं कामगाराचा पगारही निघत नाही, कित्येक दुकानदारांवरती कामगार कपातीची वेळ आलेली आहे, आज केंद्र सरकारने लावलेल्या जाचकाठीमुळे व्यापाऱ्यां च खूप नुकसान होत आहे ,मार्केटमधील कित्येक व्यापाऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे, व्यापाऱ्यांचा कोणीही वाली नाही, प्रत्येक वेळेस तोफेच्या तोंडाला व्यापारीच असतो, कधी कुठे गल्लीत मारामारी झाली किंवा कुठे काय घडलं की प्रथम बंद ही व्यापार पेठच केली जाते, यात मधेच इन्कम टॅक्स चे धाडी यामुळे व्यापारी हवाल दिल झालेला आहे, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टॅक्स गोळा करते ,परंतु याचा व्यापार ना कधीही फायदा होत नाही, कोणत्याही व्यापाऱ्याला रिटायर झाल्यानंतर पेन्शन नसते, मग म्हातारपणी आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा, जर आम्ही मोठ्या प्रमाणात सरकारला टॅक्स देतो तर सरकार आमच्यासाठी काय करते ,दुसरं म्हणजे मार्केटमधील वाढत्या स्पर्धेमुळे बँकाकडून लाखोंचं कर्ज घेऊन व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत असतो
कित्येक वेळेला बाजारपेठेतील मंदीमुळे कर्जाचे हप्ते सुद्धा देणे होत नाही, एवढ्या अडीअडचणीतून सुद्धा व्यापारी स्वतःचा व्यवसाय मोठ्या दिमाखात चालवत असतो ,दुकानात चार पाच कामगार असतील तर त्यांच्या पगारावरती त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होतो ,तरीही व्यापारी चोर कसा मग दैनंदिन मनात एकच प्रश्न येत आहे की व्यापारी म्हणजे काय चोर आहेत का, व्यापाऱ्याला एवढे जास्त अटी कशामुळे दिवसभर दुकान सांभाळून आठ आठ तास दुकानांमध्ये उभा राहून ग्राहकांना सेवा देणारा दुकानदार चोर कसा असू शकतो, गुन्हेगार कसा असू शकतो, हा प्रश्न आज प्रत्येक व्यापाऱ्याला पडलेला आहे, फक्त काय व्यापारीच भ्रष्टाचार करतो काय ,तरी या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांची केंद्र सरकारला विनंती आहे ,की व्यापाऱ्यांवरती लादलेली बंधन किंवा अटी या शिथिल कराव्यात, जीएसटी सारखे टॅक्स थोड्याफार प्रमाणात का होणे कमी करावेत जेणेकरून मालाचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांची वाढ होईल, व्यापार सुरळीत चालेल व्यापाऱ्यांच्या आत्महत्या थांबतील


0 टिप्पण्या